II श्री II
“ मराठा शासनकाळ “ हे शीर्षक ठेवण्याचे प्रमुख कारण – १७ / १८ आणि १९ व्या शतकातील मराठी राजवट ही गेली कित्येक वर्षे – मराठा – ह्या नावाशी निगडीत आहे . तेच नाव प्रचलित झाले आहे . परंतु सर्व लेखान मध्ये ,” मराठी राजवट “ हाच शब्द प्रयोग – मराठा शासन काळ हे वर्णन करण्या करता वापरला आहे .
“ मराठी राजवट “ हे शिर्षक जास्त समर्पक वाटले , जे रियासतकारांच्या ( गोविंद सखाराम सरदेसाई ) “ मराठी रियासत “ या त्यांच्या शेकडो पानी ग्रंथसंभाराला दिलेल्या नावावरून घेतले ! कालखंड – १६३० - शिवाजी महाराजांच्या जन्मा पासून ते दुसर्या बाजीरावाने १८१८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी समोर शरणागति पत्करली व राज्यावर उदक सोडले, तो पर्यन्त ठेवला आहे . ह्या संकेत स्थळावर – शिवाजी महाराज , संभाजी महाराज , राजाराम महाराज , ताराराणी आणि शाहू महाराज व पेशवाई अस्ताला जाई पर्यन्तच्या घडामोडींचे व कार्याचे लिखाण समाविष्ट असेल . वरील उल्लेख केलेल्या प्रत्येक व्यक्तिबाबत मराठीत लिखाण झालेले आहे . बरीच संकेत स्थळेही आहेत , जी उत्तम माहिती देतात . परंतु वरील सर्व व्यक्तींच्या कार्याचा उद्देश हा शेवटी, उभ्या हिंदुस्थानात बलिष्ठ मराठी राजवट ( मराठा शासन ) उभी करणे हाच होता , हे आपण विसरू शकत नाही . आणि कोणत्याही राजवटीचा विचार हा तिच्या विविध अंगांबाबत एकत्रित करावा लागतो – उ. राज्यकर्ती व्यक्ति , आर्थिक , राजकीय , लशकरी धोराणे , सामाजिक स्थिति , प्रतिस्पर्धी राजवटी इ . म्हणूनच ह्या संकेत स्थळावर – या सार्वांच्या बाबतीत लेख किंवा उल्लेख आढळेल .
१७७० नंतर मराठी राजवटीचा संबंध ज्या राजवटीशी जास्त आला – ईस्ट इंडिया कंपनी - त्या विषयी मराठीत फार कमी लिखाण झाले आहे . ही एक उणीव भरून काढायचा विचार आहे . तसा हा विषयही महत्वाचा आहे , कारण दुसर्या बाजीरावाचा पराभव करूनच कंपनीने उभ्या भारतावर जवळपास पूर्ण कब्जा केला . मराठी राजवट हीच काय तो त्यात सर्वात मोठा अडथळा होता ! त्यामुळे मराठी राजवटी बरोबर, कंपनी ( प्रतिस्पर्धी ) विषयी सुद्धा आपण खोलात जाऊन , माहिती करून / जाणून घेतले पाहिजे . ( एका अर्थाने , भारताच्या पारतंत्र्याची सुरवात , ही १८१८ पासूनच सुरू झाली ! )
वरील कारणांमुळे ह्या ब्लॉग मधील विषय हे थोडे वेगळे आहेत . या महत्वाच्या विषयांच्या / राजवटीच्या अंगांबाबत , जिज्ञासूंना, थोडीफार वेगळी माहिती द्यावी असा प्रयत्न आहे . ह्यामुळे , काही जणांना कदाचित, नवीन विचार सुचतील , त्यांच्या मनात काही प्रश्न उद्भवतील - काहींची उत्तरे मिळतील आणि विचारांना चालना मिळू शकेल .
सर्व लिखाण हे ऐतिहासिक पुस्तके , शोध निबंध इ च्या आधारेच केलेले आहे . प्रमुख आधार हा – नावाजलेले इतिहासकार - रियासतकार सरदेसाई ( यांच्या मराठी , इंग्रज व मोगल रियासत ह्या ग्रंथ / पुस्तके ) , जदूनाथ सरकार , आर सी मुजूमदार , न चि केळकर , शेजवलकर , बाबा साहेब पुरंदरे ह्यांचे व इतरांचे विषयानुरूप असलेले लिखाण हाच आहे . ईस्ट इंडिया कंपनीच्या बाबतीत मात्र काही परदेशी लेखकांच्या पुस्तकांचा, लेखांचा आधार घेतला आहे .
पुढे मागे , google map च्या आधारे बर्याच घटना
, ठिकाणे इ दाखवण्याचा विचार आहे. लिखाणाची भाषा , सध्यातरी फक्त मराठीच ठेवली आहे . काही काळा नंतर , इंग्रजी
आवृत्ती द्यायचा विचार आहे . ह्यातील मते , व्यक्त केले विचार हे माझे स्वता:चे आहेत . ते
कुणास पटतील किंवा त्या बाबत मतभेदही असतील ,ती गोष्ट अलाहिदा .
वाचकांचे
अभिप्राय विचारात घेऊन योग्य त्या चुका नक्कीच सुधरल्या जातील . बाकी सर्व
वाचकांवर सोपवतो !