मराठी राजवटीतील सैन्या मध्ये १६५६ ते १८१८ कालखंडात झालेले
इष्ट–अनिष्ट बदल – एक आढावा
प्रस्तावना – कोणत्याही राजवटीचे राजकीय भवितव्य हे शेवटी रणांगणावरच
ठरते . राजकारण , अर्थकारण ,
परराष्ट्रधोरण , परिस्थिति इ गोष्टी ,
रणांगणावरील निकाला करता महत्वाच्या आहेत , परंतू , शेवटी रणांगणावरच राजवटीचा कस लागतो .
तिथे मात्र, दोन्ही बाजूंकडील सैन्याची रचना आणि संख्या, शस्त्रास्त्रे ( arms ), डावपेच आणि नेतृत्व ह्याच बाबी
शेवटी निर्णायक ठरतात . मराठी राजवटीच्या सैन्याने १६५६ ( जावळी विजय ) पासून ते
१८१८ ( पेशवाईचा अंत ) पर्यन्त च्या विस्तृत कालखंडात ,
असंख्य छोट्या मोठ्या लढाया लढल्या . मराठी राजवट , समकालीन
देशी ( निजाम , मोगल , राजपूत , जाट इ ) इतर राजवटीन विरुध्द्धच्या लढायात वरचढ ठरली . परंतु परकीय (अब्दाली –
पानिपत १७६१ आणि इंग्रज – दुसरे व तिसरे
मराठा – इंग्रज युद्ध ) डावपेच व नेतृत्वा विरुध्द्ध झालेल्या वरील दोन्ही लढायत मात्र तिला हार
पत्करावी लागली . कारणे काहीही असोत , पण निकाल आपल्या
विरुध्द्ध लागला . या अत्यंत महत्वाच्या
परभवान मुळे मराठी राजवटीचे राजकीय भवितव्य बदलले . त्यामुळेच मराठी राजवटीचा उदय, विस्तार व अस्ताचा विचार करतांना – सैन्य शक्तिची झालेली स्थित्यंतरे (
बदल ) लक्षात घेणे महत्वाचे ठरते .
हा कालखंड तीन काळात विभागता
येतो – पहिला - शिवकालीन (१६५६ - १६८०)
पर्यन्तचा , जो पायाभरणी , विस्तारचा होता
. १६८० मधील शिवाजी
महाराजांच्या मृत्यू नंतर , औरंगजेबा विरुध्द्धच्या स्वातंत्र्य
युद्धाचा दूसरा (१६८२-१७१३), जो अस्थिरतेचा व धामधुमीचा होता
आणि तिसरा पेशवेकालीन (१७१३-१८१८) कालखंड – जो परत विस्तार आणि अंत यांचा होता . जवळ जवळ पावणेदोनशे ( १७५ ) वर्षांच्या कालखंडात
हे बदल घडले .
असे हे इष्ट व अनिष्ट असे
दोन्ही बदल , दोन प्रमुख घटनान मुळे घडून आले – १ ) पहिली घटना – १६८१/२ ची
औरंगजेबाची दख्खन वरील स्वारी ( शिवाजी महाराजांच्या १६८० मधील मृत्यू नंतर ) आणि २ ) दुसरी घटना– १७७० नंतर , भारतीय राजकारणात झालेला – ईस्ट इंडिया कंपनीचा ( इंग्रज ) उदय ( १६६४
बक्सर विजय आणि १६६५ मधील बंगालची “ दिवाणी “ मिळाल्या नंतर ) .
पहिल्या घटने मुळे (
औरंगजेबाची स्वारी ) मराठी राजवटीची व सैन्याची रचनाच बदलली . दुसर्या घटने मुळे ( १७७० नंतर इंग्रजांचा उदय ) युद्ध तंत्र
आणि पद्धती बदलली ! दोन्ही घटना ह्या मराठी राजवट व सैन्याच्या दृष्टीने अभूतपूर्व
आणि कलाटणी देणार्या आशा होत्या . त्यामुळे झालेले बदल हे अपरिहार्य होते , ज्याकरता कोणाला दोष किंवा जबाबदार धरता येणार नाही !
काही महत्वाचे बदल
पहिला महत्वाचा बदल राज्याच्या
सैन्याच्या बाबतीत झाला . शिवाजी महाराजांच्या वेळेस सर्व सैन्य हे राज्याचे –
शिवाजी महाराजांचे होते . जे एकसंध , एकमुखी असे होते . पेशवाईत
मात्र , मराठी राजवटीचे सैन्य ( सरकारचे ) असा प्रकार नव्हता
. सरदार घराण्यांचे सैन्य – होळकर , शिंदे , भोसले , पटवर्धन वगैरे आणि पेशव्यांचे ( हुजरातीचे ) सैन्य असे
वेगवेगळे होते . त्यांचे नेतृत्व , शस्त्रे , युध्ध पद्धती इ वेगवेगळे होते .
दूसरा बदल हा मराठी राजवटीचा
महाराष्ट्र बाहेरील प्रदेशान मध्ये झालेल्या विस्तारा मुळे झाला .त्यामुळे
सैन्याची रचना बदलली . ती एकमुखीपणा जाऊन बहुमुखी ( शिंदे , होळकर , भोसले इ ) होण्यात झाली . त्यामुळे लशकरी
डावपेच , नवीन युद्ध पद्धती ( कवायती सैन्य , तोफखाना ) अंगिकारताना विस्कळीतपणा आला . शिंदे यांनी कवायती फौज आणि
तोफखाना ह्यांचा उत्तम पणे वापर केला , परंतु पेशव्यांना तसा
बदल तितकासा करता आला नाही
तिसरा बदल हा , सैन्याच्या मनुष्यबळाच्या रचनेच्या बाबतीत झाला . शिवाजी महाराजांच्या
कारकीर्दीत , सैन्य प्रामुख्याने “ मराठी “ होते जे जिवावर
उदार होऊन लढायला तयार असायचे . परंतु खासकरून पेशवाईत जागीरदारी पद्धतीमुळे , “ मराठी ( महाराष्ट्रातील ) “सैन्याची संख्या कमी कमी होऊन , शेवटी ती जवळपास १० टक्क्यावर आली ! गारदी ,
पेंढारी , उत्तर हिंदुस्तानी आणि परकीय सैन्य संख्या फार
वाढली – जे पैशाकरता किंवा लूटी करता लढत असत , ज्याचा
परिणाम बर्याच गोष्टींवर झाला .
१७६४ बकसरच्या लढाई नंतर , इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनी
नावाने एक नवीन – परकीय सत्ता भारतीय राजकारणात उदयाला आली ,
ज्यांचा भर , कवायती सैन्य आणि उत्तम बंदूका / हलक्या तोफखान्या
वर होता . लढाईच्या पद्धतीत झालेला हा बदल , भारतीय युद्ध
इतिहासात प्रथमच घडत होता , जो अभूतपूर्व असा होता !
त्यामुळे , मराठी राजवटीसकट इतर भारतीय राजवटींना , त्याच्या बरोबर जुळवून घ्यावे
लागले व स्वता:च्या सैन्य रचनेत व पद्धतीत बदल घडवून आणणे भाग पडले. हा चौथा बदल
मात्र रणांगणावर निर्णायक ठरला !
इष्ट –
अनिष्ट बदल
अ
) मराठी राजवटीचा पाया - शिवाजी महाराजांचे सैन्य (१६५६ - १६८० पर्यन्तचा कालखंड)
शिवाजी
महाराजांच्या वेळेस पायदळाची आवशकता ही
प्रामुख्याने जिंकलेल्या गड / किल्ले यावर पहारे / रक्षण करण्या करिता किंवा वेढा
घालताना भासत असे. तसेच डोंगर दर्यातील लढायान करता पायदळच वापरणे शक्य होते . महत्वाचे म्हणजे रात्री घोडदळ
हे कूचकामी ठरते , त्यांचा उपयोग दिवसाच योग्य तर्हेने
होऊशकत असे . परंतु दिवसा एव्हडेच रात्रीही पायदळ उपयुक्त ठरत असे . पायदळाची गरज
जास्त भासत असल्या मुळे, त्यांची संख्या ( घोडदळा पेक्षा ) जास्त
होती . एकंदरच , पायदळाला ,
घोडदळापेक्षा जास्त महत्व होते आणि संख्या ही बरीच जास्त होती .
महाराजांच्या
घोडदळा मध्ये दोन प्रकारचे सैनिक होते -
बारगीर व शिलेदार . बारगीर हा सरकारी घोडा व शस्त्र वापरत असे . परंतु शिलेदार हा
स्वता:चा घोडा व शस्त्र वापरत असे . सुरवातीला शिलेदारांची संख्या बारगीरांच्या
पेक्षा जास्त होती .परंतू एकंदरच महाराजांचा कल हा बारगीरांची संख्या शिलेदारांपेक्षा
जास्त ठेवण्याकडेच होता . त्याला प्रमुख कारण म्हणजे बारगीर सरकारी घोडा/शस्त्रे वापरत असल्याने ,
त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येणे शक्य होते व त्यांना शिस्त लावणे सोपे होते .
शिवाय लढायांमध्ये महाराजांना लूटी मध्ये असंख्य घोडी मिळत , ज्या मुळे बारगीरांची संख्या वाढविण्यास बहुमोल
मदत होत असे.
शिस्त – हे सैन्याचे फार महत्वाचे अंग होते आणि
आजही आहे . कितीही मोठे सैन्य, शिस्ती शिवाय (बेशिस्त) , रणांगणावर निरुपयोगी ठरते आणि त्याला विजय प्राप्त व्हायची शक्यता फारच
कमी असते हे, महाराजांनी हे पूर्ण पणे ओळखले होते. एव्हड्या
मोठ्या सैन्याला महाराजांनी कडक शिस्त
लावली होती . लढाई वर कोणत्याही प्रकारच्या स्त्रियांना न्यायला बंदी होती.
स्त्रियांना बंदी बनवण्यास सक्त मनाई होती . सर्व लूट सरकार जमा करावी लागत असे , ज्यामुळे सरकारी खजिन्यामध्ये योग्य अशी भर पडत असे .
प्रत्येक
हुकमाची आममलबजावणी केली जात असे . त्या बाबतीत कोणताही वेळकाढूपणा किंवा कसूर
खपवून घेतली जात नसे .कोणाचाही मुलाहिजा ठेवला जात नसे . ( घोडदळ प्रमूख नेतोजी
पालकरची तडकाफडकी उचलबांगडी केली गेली ) . परंतु त्याच बरोबर, योग्य व्यक्तींना बक्षिसे / मान सन्मान / बढती दिली जात असे.
असे हे
सर्व सैन्य महाराजांचे – स्वराज्याचे होते . त्यांचा पगार नियमित पणे सरकारी खजिन्यातून होत असे. सैन्याचा सर्व प्रकारचा खर्च सरकार
करत असे व त्याचेच नियंत्रण असे .
महाराजांच्या आज्ञेनुसार ह्या सैन्याच्या हालचाली होत असत . ( जागीरदारी नसल्याने , जागीरदारांचे सैन्य ( उ शिंदे , होळकर ) हा प्रकारच
अस्तीत्वात नव्हता . )
साधेपणा -
कोणत्याही मोहिमांमध्ये डाम डौल नसायचा . बाजारबुणगे व इतर सामानाचे लोढणे नसायचे
. हत्ती , तोफखाना हे फारसे वापरले जात नव्हते . महाराज स्वता: जेंव्हा जात असत , तेंव्हाही फक्त काही तंबू व जरूरीपुरते सामान एव्हडेच बरोबर असायचे .
सगळा भर हा जलद , चपळ व अनपेक्षित हालचालीन वर असायचा –
ज्याच्या वर मोगली किंवा आदिलशाही सैन्याकडे उत्तर नव्हते .
शास्त्रान
मध्ये – भाले , ढाल तलवार व तत्सम इतर हत्यारे वापरली जात .
बंदूका फार कमी प्रमाणात वापरल्या जात . तोफा ह्या किल्ल्यांच्या रक्षणा करताच
वापरल्या जात . जलद हालचालींना तोफान मुळे अडथळा होत असे . शिवाय सह्याद्रीच्या डोंगर
दर्यातून तोफानची वाहतूक करणे जवळ पास
अशक्य होते .
नेमणूका -
नेमणूका वंश परंपरागत पद्धतीने होत नसत , तर “ गुणांच्या ( कर्तुत्व , कामगिरी , निष्ठा इ ) “ आधारावर होत असत . त्यामुळेच राज्याचे / सैन्याचे नेतृत्व
योग्य अशा व्यक्तिन कडे असायचे .
काही
गोष्टी येथे स्पष्ट व्हायला पाहिजेत . बहुसंख्य सैन्य हे महाराष्ट्रातील ( मावळे , शेतकरी ) होते , त्यामुळे एकप्रकारचा सांस्कृतिक एकजिनसी पणा होता. दसर्याला सैन्य
मोहिमेवर निघून , पावसाळ्या पूर्वी परत येत असे . मोहिमा, महिनोनमहीने चालत नसत . अंतरे, काही अपवाद वगळता (
दक्षिण दिग्विजय , सूरत स्वारी , आग्रा
भेट इ ) , फार जास्त नसायची , कारण
दक्षिणेतील काही प्रदेश वगळता , स्वराज्य हे घाटमाथा व कोकण
ह्या पट्टीतच पसरले होते . स्वराज्याचा “ कणा “ – किल्ले हाच होता .
असे हे
एकसंध परंतु बहू धर्मीय / जातीय असलेले , शिस्तबद्ध सैन्य , एकमुखी होते .
एकाचेच नेतृत्व असायचे . ह्या सैन्याला आपण “ स्वराज्य आणि सुशासना साठी “ लढतो
आहोत ह्याची कल्पना होती.
अशा
आदर्शवत सैन्या मध्ये दूरगामी बदल झाले ते औरंगजेबाच्या ( १६८२ – १७०७ ) दख्खन
वरील स्वारीमुळे घडले . संभाजी व राजाराम महाराज व ताराराणी यांनी मोगलां विरुद्ध
“ स्वातंत्र्य “ युद्ध लढून मोगली राजवटीला जवळपास भिकेला लावले ज्यामुळे ते खीळखिळे होत
गेले . महाराष्ट्र जिंकण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही . हा फार मोठा “ विजय
“ होता . परंतु त्याच बरोबर काही इष्ट तर
काही अनिष्ट बदल मराठी राजवटीच्या रचनेत घडले . त्या परिणामी
स्वरूप मराठी राजवटीच्या सैन्याच्या पद्धती , रचना , जी शिवाजी महाराजांनी लावाली होती ती , पार बदलली .
अर्थात त्यातील काही बदल हे राजवटीच्या विस्ताराने घडणे अपरिहार्य होते . परंतु
बरेच बदल हे औरंगजेबाच्या स्वारी मुळेच घडले .
ब
) औरंगजेबाची दख्खन स्वारी ( १६८२-१७१३ कालखंड ) आणि सैन्य रचना , व्यवस्थेतील बदल :-
इष्ट
बदल - सैन्य संख्ये
पेक्षा रचना आणि व्यवस्थेत , १६८० नंतर ( विशेषता: १६८९ मधील
संभाजी महाराजांच्या वधानंतर ) झालेले बदल
फार दूरगामी होते .
मुख्य फरक
पडला तो त्याच्या रचनेत व व्यवस्थेत पडला , त्याची सुरवात
औरंगजेबाच्या १६८२ मधील दख्खन वरील स्वारीच्या वेळे पासून झाली . १६८९ मधील संभाजी
महाराजांच्या वधा नंतर परिस्थिति पार बदलली . प्रचंड मोगली सैन्याने जवळपास सर्व
दख्खन व्यापल्या मुळे ( महाराष्ट्र , विजापूर , गोवळकोंडा ) , त्यांच्या वर ठीकठिकाणी हल्ले करून पसार व्हायला मराठ्यांना
घोडदळावरच अवलबून राहावे लागत होते . लांब पल्ले गाठायला आणि वेगवान हालचाली
करायला , घोडदळच कामी येऊ शकत होते . शिवाय मोगलांच्या
विरुद्ध जवळपास सर्व लढाया ह्या मैदानी प्रदेशातच झाल्या . त्यामुळेच पायदळाचे
महत्व , जे किल्यान मुळे जास्त होते ,
ते कमी कमी होत गेले . हा बदल इष्ट असा होता , ज्याचा उपयोग , १७१३ नंतरच्या राज्य विस्तारा मध्ये झाला . दूसरा इष्ट बदल हा
आत्मविश्वास आणि दृष्टी मध्ये झाला . शिवकालीन राज्य हे प्रामुख्याने
महाराष्ट्राच्या किनारपट्टी व घाटमाथा एव्हडेच मर्यादित होते . सैन्याने फक्त
एकदाच – महाराजांच्या १६६५ च्या आग्रा भेटीच्या वेळेस झालेल्या प्रवासात – नर्मदा
ओलांडली होती . त्यामुळेच सैन्याची दृष्टी महाराष्ट्रा पुरती सीमित होती .
औरंगजेबाच्या स्वारी मुळे , मराठी सैन्याला – नर्मदा
ओलांडावी लागली आणि गुजरात , माळवा इ परदेशात मोहिमा
काढाव्या लागल्या . त्यामुळेच , पुढे मराठी राजवटीचा विस्तार
माळवा , दिल्ली , गुजरात , ओरिसा ह्या प्रदेशा पर्यन्त असा होऊ शकला . सैन्याची दृष्टी विशाल होत
गेली , जे इष्ट होते .
त्याच
बरोबर सैन्याचा आत्मविश्वास , जो शिवाजी महाराजां ( स्वराज्या
) मुळे मिळाला होता , तो, औरंगजेबाची
महाराष्ट्र काबिज करण्याची महत्वाकांक्षा धुळीला मिळवल्या मुळे दुणावला . शिवाय २७
वर्षांच्या स्वातंत्र्य युद्धात , नवीन नेतृत्व – दाभाडे , भोसले , कान्होजी आंग्रे इ तयार झाले . असे अनेक
सदार प्रबळ होत गेले , की जे पहिल्या पासूनच स्वता:च्या
हिमतीवर व कर्तुत्वाने त्यांचा ठसा उमटवित गेले . अशा सरदारांवर छत्रपतींचा लष्करी
अधिकार न राहाता , फक्त नैतिक अधिकार उरला . इतर प्रदेशातील विस्तारामुळे राज्यचा “ किल्ले “ हा कणा आपोआप नाहीसा झाला , कारण वरील सर्व प्रदेश हे मैदानी होते . मैदानी प्रदेशातील स्वार्यानमुळे
, युध्ध पद्धतीत सुध्धा बदल घडून आला – डोंगरी युध्धा पेक्षा
, मोगलांशी समोरा समोर लढावे लागू लागले . नवीन युध्ध पद्धती
आत्मसात होत गेली . मोगलांविरुध्द्ध अवलंबिलेल्या गतिमान युध्धा मुळे, घोडदळाचे महत्व आणि
संख्या , पायदळा पेक्षा फार वाढली .
अनिष्ट बदल
-
संभाजी
महाराज असे पर्यन्त सैन्याची शिस्त , जवळपास तशीच राहिली
. शिवाय सैन्य – एकसंध व एकमुखी होते . संभाजी महाराज स्वता:
मोहिमेवर जाऊन नेतृत्व करीत होते . परंतु त्यांच्या वधानंतर परिस्थिने फार वेगळे
वळण घेतले . राजाराम महाराजांना वतनदारी आणि जागीरदारीचे आमिष मराठी सरदारांना
दाखवावे लागले , कारण औरंगजेबाचा पराभव करायचा हेच महत्वाचे
उद्दीष्ट होते . जो तो सैन्य उभे करून , मोगलांना हैराण करून , खंडण्या घेऊन त्यांचा प्रदेश
हस्तगत करत गेला आणि वतनदार / जागीरदार बनत गेला . असे बरेच छोटे छोटे सरदार तयार
झाले . परंतु त्यात शिवाजी महाराजांनी लावलेली सैन्याची
शिस्त पार बिघडली/नाहीशी झाली. परिस्थिति फार विस्कळीत व गोंधळाची झाली . मोगली
सैन्याची केलेली लूट , त्यांच्या कडून घेतलेल्या खंडण्या
सरकार जमा करणे हे नाहीसे झाले . हे सर्व जवळ जवळ १८ वर्षे चालले ( १६८९-१७०७ ) .शिवाजी
महाराजांच्या काळातील असलेला “ सरकारी / राजवटीचे सैन्य “ हा प्रकारच नाहीसा झाला , कारण असे सैन्य उभारणे व ते वाढवणे ह्या करता लागणारा पैसाच राज्याकडे
नव्हता .
शाहू
महाराजांच्या १७०७ मधील सुटके नंतर व विशेषता: बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद
दिल्यावर ( १७१३ ) , राज्याच्या रचनेत आणि कारभार पद्धतीत
परत एकदा अतिशय दूरगामी बदल घडून आला . औरंगजेबाच्या स्वारीनंतर आलेला , विस्कळीतपणा , गोंधळ , बेशिस्ती
अशा अनिष्ट गोष्टींना एका व्यवस्थेत गुंफण्या करता – शाहू महाराज आणि बाळाजी
विश्वनाथ यांनी “ मराठी राजमंडळ ( confederacy) “
अस्तीत्वात आणले .प्रबळ झालेल्या
सरदारांना – दाभाडे ( गुजरात ) , भोसले ( नागपूर ) , शिंदे , पवार , होळकर – ( माळवा ) ,
आंग्रे ( कोकण किनारपट्टी ) आणि पेशवे
यांना - वतने आणि जागीरदारीकरता प्रदेश
नेमून दिले . ह्या सरदारांनी त्यांच्या प्रदेशावर “ राज्य ( ? ) “ करायची मुभा दिलीगेली . ( हे सर्व वंश परंपरागत केले गेले. ) सैन्य बाळगण्याची ,शांतता
राखण्याची , मोगलांनी
दिलेल्या चौथाई व सरदेशमुखी सनदानुसार वसूली करायची अशा अनेक जबाबदार्या टाकण्यात
आल्या .त्यामुळे प्रत्येक जण आपआपल्या प्रदेशाचे जवळपास – राजे – अशी व्यवस्था
तयार झाली . “ सरकारचे सैन्य “ हा प्रकार नाहीसा होऊन, त्या ऐवजी सरदारांचे सैन्य हेच राजवटीचे सैन्य अशी परिस्थिति होत गेली . सैन्याचा एकसंध, एकमुखीपणा
नष्ट होऊन – ते बहूमुखी व अलग अलग पद्धती अंगिकारलेल्या अशा सैन्यात रूपांतर झाले .
असे असूनही , नानासाहेब
पेशव्यांच्या मृत्यू पर्यन्त ( १७६१ ) आशा बहू मुखी नेतृत्वात थोडा तरी
समन्वय होता , एकी होती . परंतु त्या नंतर मात्र आपापसातल्या
दुहींनी ( पेशवे- भोसले , मधवराव पेशवे – राघोबा दादा , शिंदे - होळकर इ ) मराठी राजवटीला ग्रासले
क ) पेशवाईचा
कालखंडात ( १७१३-१८१८ ) झालेले बदल
पेशवाईत मराठी राजवटीचे
उत्पन्न हे चौथाई व सरदेशमुखीची वसूली , ह्यावरच सर्वात
जास्त अवलंबून होते. त्यामुळे , मोगली
सनदेनुसार मिळालेल्या प्रदेशातून उत्पन्न / वसूली करता मोहिमा आणि वसूली न
झाल्यास मोहिमेच्या खर्चा करिता परत
मोहिमा , असे दुष्टचक्र तयार झाले . ज्यामुळे चौथाई /
सदेशमुखीची वसूली न मिळाल्यास लुटालूट किंवा खंडणी असा क्रम सुरू झाला . “
स्वराज्याकरता लढणे “ ह्या ऐवजी “
पैशाच्या वसूली करता लढणे,
असे सुरू झाले . [ ह्या सर्वाचा परिणाम - मराठी राजवटीवर “ लुटारू “ असा
शिक्का बसण्यात झाला. ] ह्याचा परिणाम
सैन्याच्या रचनेत झाला . “ जिवावर उदार होऊन “ लढणार्या सैनिकांची जागा , भाडोत्री सैनिकांनी घेतली . “ गारदी , पेंढारी “
ह्यांची संख्या बरीच वाढली, ज्यामुळे सैन्या वरील खर्च कमी
करता आला. परंतु असे सैन्य आपली निष्ठा , पैशाच्या आमिषाने , केव्हाही बदलू शकत असे . पेंढारी
तर पैशा करता , स्वता:च्या मालकाच्या सैन्याची/ प्रदेशाची
लूट करायला मागेपुढे पाहत नसत ! तसेच पराभव दिसू लागल्यावर रणांगणातून पळून
जाण्यास त्यांना वेळ लागत नसे . शिस्तीने माघार घेणे किंवा शत्रूवर प्रतीहल्ला
करणे इ ह्या सैनिकांना जमत नसे किंवा ते टाळत असत . स्वता:चा जीव वाचवणे हेच
श्रेयस्कर समजत . ( जिवावर उदार होऊन लढणार्या शिवाजी महाराजांच्या वेळच्या
सैन्याची , हळू हळू , कळत - नकळत अशी
अवस्था होत गेली . कालाय तस्मै नमा: !
)
असे काही महत्वाचे दोष /
उणीवा असूनही , मराठी राजवटीने , पेशवाईत –
१७१३ ते १७९५ पर्यन्त ( १७६१ चा अपवाद
वगळता ) बहुसंख्य लढाया जिंकल्या ! आणि जवळपास ६०-७० टक्के भारतावर आणि दिल्लीवर आपला
अम्मल बसवला . एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या सर्व लढाया स्थानिक राजवटी
विरुद्ध होत्या , ज्या मध्ये मराठी राजवटीचे सैन्य वरचढ ठरत
गेले . परंतु जेंव्हा इंग्रजांच्या ( कंपनीच्या ) अतिशय वेगळ्या प्रकारे युद्ध
पद्धती अंगिकारलेल्या - कवायती फौजा , बंदुका / तोफखाना युक्त सैन्याशी व नेतृत्वाची गाठ पडली , तेव्हा ह्यातील उणिवा / दोष उघडे
पडले .
ड ) इंग्रजांमुळे
युद्ध पद्धतीत झालेला बदल - १६६४ च्या बक्सरच्या विजया मुळे , त्या पुढील कालखंडात , इंग्रज ( ईस्ट इंडिया कंपनी
) नावाची एक राजकीय व लष्करी सत्ता भारतीय उपखंडात उदयाला आली , ज्याची दाखल इतर सर्व देशी राजवटीना घ्यावी लागली . ह्या सर्वांना
कंपनीच्या नवीन राजकीय व लष्करी
डावपेचांची ओळख झाली व त्यानुसार स्वता:च्या युद्धपद्धतीत बदल करावा लागला .
कंपनीचा भर हा – शिस्तबद्ध कवायती
फौजा , उत्तम बंदुका आणि तोफखान्याचा वापर , आणि त्यामुळे
सामोरा समोर लढाया करण्यावर होता . ह्या सर्वांमुळे पायदळाचे महत्व फार वाढून , घोडदळाचे महत्व कमी होत गेले . (
बंदुका – तोफांच्या मार्या पुढे घोडदळ निष्प्रभ ठरू लागले . परंतु काही प्रसंगात
घोडदळ फार परिणाम कारक होत असे . इंग्रजांच्या फौजेत सुरवातीस घोडदळ नव्हते . १८
व्या शतकाच्या शेवटी इंग्रजांच्या फौजेत , घोडदळ अस्तीत्वात आले . )
कंपनीचे सैन्य एकमुखी व एकसंध असे होते . हे सर्व भारतीय देशी राजवटींना नवीन होते . देशी राजवटींचे सैन्य कवायती नव्हते
. ते विस्कळीत , बेशिस्त आणि बहू मुखी होते . तोफा बंदुका
कमी पल्ल्याच्या व अचूक नव्हत्या . दारूगोळा सुद्धा चांगला नव्हता . अशा विषम सैन्य स्थिति व युद्ध पद्धतीमुळे
रणांगणावर सुरवातीला इंग्रजान विरुद्ध विजय मिळणे शक्य नव्हते . परंतु पुढे –
शिंदे , पेशवे आणि टिपू यांनी मात्र , इंग्रजी युद्धपद्धती व त्यानुसार सैन्य उभारण्याचा प्रयत्न केला . त्यात शिंदे आणि टिपू
ह्यांनी तर इंग्रजांच्या पद्धती आत्मसात
करून – कवायती फौजा , उत्तम तोफा – बंदुका , दारूगोळा युक्त सैन्य तयार केले व इंग्रजांना काही वेळेस पराभूत केले .
कंपनीच्या
कवायती व शिस्तबद्ध सैन्याची वैशिष्ठ्ये –
कंपनीच्या कवायती फौजेची बांधणी बक्सर ( १७६४ ) च्या आधी पासून झाली होती . अशा
सैन्याला एक पोशाख – लाल डगल ( coat ) – घालावे लागत . पुढे , त्यांना तोफा – बंदुका वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात असे . त्याच
प्रमाणे शिस्तबद्ध माघार घेणे , किंवा पराभव दिसत असताना
सुद्धा लढण्याचे शिकवले जात असे . त्यामुळे सैन्य प्रमुख किंवा इतर अधिकारी जखमी
किंवा कामी आले , तर पळापळ होत नसे . असे सैन्य जरी देशी आणि विदेशी मिळून तयार केले
असले तरी त्यांचे नेतृत्व इंग्रज/यूरोपियन अधिरार्यान कडेच असे, जे सुद्धा
प्रशिक्षित असे होते . अशा कंपनीच्या सैन्याच्या जोडीला – इंग्लंडच्या राजाचे (
सरकारी ) सैन्य सुद्धा १७५३ पासून मदतीला तयार असे .
तोफा सुद्धा हलक्या परंतु त्या
मानाने अचूक असत आणि त्यांचा दारूगोळा अत्यंत चांगल्या प्रतीचा असे ( त्यांना तो
लागेल तेव्हडा पुरवला जात असे ! पेशव्यांच्या तोफखान्याला दारूगोळा बराच मर्यादित
पुरवठा होत असे, ज्या मुळे त्यांची मारक क्षमता /
परिणामकारकता फार कमी होती ) . गोलंदाज (
तोफा चालवणारे ) हे सुद्धा प्रशिक्षित असत . त्यामुळे तोफानची मारक क्षमता फार परिणामकारक
असे . अशा प्रकारे – कवायती सैन्य, बंदुका व तोफा यांनी सज्ज
असलेल्या, सैन्याचा रणांगणावर परिणामकारक वापर करण्याचे
तंत्रही त्यांच्या अधिकार्यांना अवगत
होते . ( युरोप मधील अनुभव आणि इंग्रज – फ्रेंच यांची भारतातील ३ “कर्नाटक युद्धे” (१७४६ - १७६३) , यांची मोलाची मदत झाली )
असे सैन्य तयार करून त्यांना
“ पोसणे “ - पगार , उच्च प्रतीच्या तोफा , बंदुका व दारूगोळा पुरवणे इ
सर्व फार खार्चीक असे . १७६५ नंतर कंपनीचा
खर्चाचा प्रश्न – बंगालची “ दिवाणी “ मिळाल्याने सुटायला फार मदत झाली . ( इतर बर्याच
छोट्या छोट्या देशी राजवटीनना असा खर्च करणे शकय नव्हते – कारण तेव्हडे उत्पन्नच
नव्हते ) ॰ त्या मुळेच फक्त मोठ्या – पेशवे , शिंदे , होळकर ( मराठी राजवट ) , टिपू इ राजवटीननी इंग्रजांच्या / कंपनीच्या नवीन युद्ध पद्धतीचा अंगिकार
करण्याचा प्रयत्न केला. )
देशी राजवटींचे – इंग्रजी सैन्य व युद्ध
पद्धती – अंगिकारण्याचे प्रयत्न - स्थानीय राजवटीनमध्ये , सदाशिवराव भाऊंनी , १७६१ च्या पानीपत युद्धात , इब्राहीम खान गारदीच्या तोफखान्याचा मोठ्या प्रमाणावर – एक परिणामकारक
अस्त्र म्हणून वापर केला . परंतु या नवीन पद्धतीमधे - पायदळ , घोडदळ व तोफखान्याचा जो
समन्वय असावा लागतो , त्याचा अभाव दिसला . त्यामुळे
सुरवातीला जरी तोफखान्याने चांगली कामगिरी केली , तरी , या समन्वयाच्या आभावा मुळे नंतर अब्दालीच्या सैन्याला, तोफखाना बंद पाडण्यात यश आले .
यामुळे एक गोष्ट सिद्ध होते
की , केवळ नवीन शस्त्रास्त्रे वापरून रणांगणावर यश मिळेलच याची खात्री देता येत नाही
. त्या करता त्याचा योग्य वापर करण्याच्या पद्धतीचा अंगीकार करावा लागतो , तरच त्या अस्त्राचा परिणाम दिसतो
. या पद्धती मध्ये, कोणती शस्त्रे ( तोफा , बंदुका ) – कोणत्या प्रकारची , कुठे, कशा तर्हेने व केव्हा वापरावी हे महत्वाचे असते . त्याच बरोबर त्यांच्या
चालकांना योग्य प्रशिक्षण देणे , दारूगोळा पाहिजे त्या
प्रमाणात पुरवणे , देखभाल करणे ह्याचीही जरूर असते . या सर्वांचा वापर
करूशकणारे प्रशिक्षित सैन्य अधिकारी तयार करणे हे तेव्हडेच महत्वाचे असते . एव्हडे
सर्व व्याप करायला , राज्यकर्त्याकडे तेव्हडी दूर दृष्टी , इच्छाशक्ती असावी लागते . अशा
सैन्याची उभारणी करायला आणि बाळगायला फार मोठ्या प्रमाणावर “ पैसा “ लागतो , स्थानिक राजवटीन कडे ज्याची नेहमीच कमतरता होती ! शिवाय सर्वात मोठा
प्रश्न – हे सर्व शून्यातून सुरू करायला योग्य माणूस मिळणे ,
हा होता ! महाद्जी शिंदे यांनी फ्रेंच
अधिकारी – डी बोयंगी याची मदत घेतली .
परंतु हे सर्व करायला जो पैसा लागतो त्या करता , त्यांना मोठ्या उत्पन्नाचा मुलुख तोडून ( जागिर
) डी बोयंगीला द्यावा लागला .
आणखी एका महत्वाच्या गोष्टी
कडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही . तो म्हणजे नव्या – जुन्या युद्ध पद्धतीचा मिलाफ
कसा साधायचा ? त्याला किती वेळ द्यायचा ?
मराठी राजवट किंवा इतर स्थानिक राजवटींची पारंपारिक युद्ध पद्धती होती , जी शेकडो वर्षे चालू होती व ज्यात घोडदळाला पायदळापेक्षा जास्त महत्व दिले गेले होते .
शिवाय , मराठी राजवटीचा भर हा चपळ हालचालीने “ गनिमी कावा” करून शत्रूला जेरीस ( अडचणीच्या
जागेत कोंडीत पकडायचे आणि रसद मारायची ) आणण्यावर होता . ह्यात भारी तोफखान्याचे
महत्व कमी होणे अपरिहार्य होते , कारण तोफखाना बरोबर घेऊन , जलद हालचाली करणे शक्य नव्हते . त्यामुळे शत्रूशी समोरा-समोर युद्ध शक्य तोवर टाळले जात
असे . नवीन इंग्रजांच्या युद्धापद्धती मध्ये कवायती पायदळाला आणि तोफखान्याला फार
महत्व दिले गेले होते व घोडदळाचे महत्व
कमी होत गेले . त्यामुळे एका जागी - सामोरा समोर युद्ध करणे हेच अपेक्षित होते . ह्याच
कारणा वरून , स्थानिक राजवटीनना नव्या – जुन्या पद्धती एकत्र
वापरण्याला अंतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागत होते . ( पानिपतवर १७६१ मध्ये , मल्हारराव होळकरांचा , ह्याच कारणावरून सदाशिवराव
भाऊंच्या डावपेचांना – तोफखाना घेऊन सामोरा-समोर लढयला - विरोध होता . महादजींना सुद्धा असाच विरोध सहन करावा लागला .
आजही जुन्या – नव्यांचा संघर्ष असतो . कोणत्याही देशाच्या सैन्यात आजच्या काळातही असे
बदल करणे, हे कठीण आणि वेळखाऊ काम आहे ! )
शिवाय , असे कवायती सैन्य / तोफखाना तयार करून
त्याचा योग्य रीतीने रणांगणावर वापर करणारे स्थानीय / देशी अधिकारीच नव्हते
, कारण सर्वांनाच हे नवीन होते ! त्या मुळे , यूरोपियन - किंवा
परदेशी अधिकार्यांच्या हाताखाली आशा कवायती सैन्य तुकड्या तयार करून त्याचे
नेतृत्व देणे भाग पडले .( हे अधिकारी काही अपवाद वगळता ,
ह्या युद्ध पद्धती , शस्त्रे , डावपेच
बद्दल मुळीच प्रशिक्षित / परिचित नव्हते . तरीही त्यांना हे काम द्यावे लागले –
इतकी अशा अधिकार्यांची कमतरता होती ! त्यांची
“ निष्ठा “ पैसा आणि मान मरातब ह्यावर जास्त असायची . असे
बहुतेक युरोपीयन अधिकारी कंपनी ( इंग्रज ) यांच्या विरुद्ध लढायला नकार देत . हेच
पुढे दौलतराव शिंदे यांना १८०२/३ च्या दुसर्या मराठा – इंग्रज युद्धात भोवले आणि
पराभव पत्करावा लागला )
असे जरी असले , तरी पेशवे किंवा इतरांना त्या बाबत पूर्ण पणे दोष देता येत नाही .
त्यांच्या कडे तेव्हडा वेळच नव्हता . सतत –
निजाम , हैदर/ टिपू , जाट , इंग्रज , रोहिले इ बरोबर लढाया होत असत . त्याच
बरोबर आपापसातील – शिंदे – होळकर , भोसले – पेशवे , माधव राव – राघोबदादा , इ संघर्षा मध्ये बराच वेळ , पैसा आणि सैन्य शक्ति खर्च झाली . त्या शिवाय – असे कवायती सैन्य उभारून , त्यांना प्रशिक्षण देऊन , जुन्या ( गनिमी कावा ) - नव्या
पद्धतीचा ( तोफा आणि कवायती फौजा ) यांचा मिलाफ कसा साधायचा याचा विचार करून ते
अमलात आणणे ही फार कठीण गोष्ट होती , आणि आजही तेच खरे आहे !
आशा परिस्थित महादजि शिंदे
यांनी फ्रेंच अधिकारी – डी बोयंगी याची
मदत घेतली आणि प्रथम २ आणि १७९० नंतर १० बटालियन ( २ हजार सैन्याची एक ) संपूर्ण नवीन धरती वर उभारल्या . आशा सैन्याने
काही लढायात आपली चमक दाखवली .महादाजी
यांनी आग्र्या जवळ , दारूगोळा, तोफा
, बंदुका तयार करण्याचा कारखाना सुद्धा काढला होता , ज्यात चांगल्या प्रतीचा माल तयार होत असे ! पेशव्यांनी ही असे दोन कारखाने – दारूगोळा /
तोफा तयार करण्याचे कारखाने काढले होते , परंतु त्यात फार
हलक्या प्रतीचे उत्पादन होत होते . परंतु ह्या बदला मध्ये ,
घोडदळाकडे दुर्लक्ष होत गेले , ज्याचा परिणाम शिंदे – इंग्रज
यांच्या असाये च्या लढाईल दिसला , असे इंग्रज इतिहासकारांचे
/ सैन्य अधिकार्यांचे मत आहे .
मराठ्यांच्या घोडळाबाबत , काही गोष्टी स्पष्ट कराव्या लागतील . शिंदे , होळकर
, भोसले ह्यांनी घोडदळा कडे दुर्लक्ष केल हा आरोप होतो , ह्याचे कारण फार वेगळे असावे .
ह्या सर्वांचे घोडदळ , कुचकामी नव्हते , तर बेशिस्त होते . त्यांनी भारतीय पद्धती प्रमाणे लढाया केल्या . या उलट
इंग्रजांनी १७८४ मध्ये पहिल्यांदा घोडदळ आणल , जे शिस्तबद्ध
आणि प्रशिक्षित होते . त्यात प्रामुख्याने दोन
प्रकार होते , - एक ड्रागून आणि दुसरे – लॅनसर .
ड्रागून हे घोड्या वरून रणांगणावर येत ,परंतु लढाई मध्ये
खाली उतरून , हातघाईची लढाई करू शकत . लॅनसर तुकडी ही लांब
भाले घेऊनच लढाया करत ज्यामुळे तलवार घेऊन लढाई करणार्या घोडदळा विरूद्ध यशस्वी होत .
इंग्रजांना , अशा शिस्तबद्ध पायदळ , तोफखाना व घोडदळ यांचा
एकत्रित वापर कसा व केंव्हा करावा, या विषयी पूर्ण कल्पना
होती . याउलट ,
मराठी राजवटीच्या घोड दळाची स्थिति होती . ते शूर होते ,
घोडे उत्तम रित्या हाताळू शकत होते , परंतू बेशिस्त होते .त्यांचा
भर हा संख्ये वर होता . आशा बेशिस्त ( disorganized ) घोड
दळाची- शिस्तबद्ध पायदळ , तोफखाना इ
बरोबर उत्तम रितीने सांगड घालून , इंग्रजांना ( ते संख्येने फार कमी असूनही ) तोंड देणे हे त्यांना जमले
नाही . ( ह्याचे कारण फक्त सैन्य नसून - नेतृत्व , एकीचा आभाव , पैशाची कमी , ही सुद्धा महत्वाची कारणे आहेत )
दुसर्या एका महत्वाच्या
बाबी कडे इतिहासकार / सैन्य अधिकारी दुर्लक्ष करतात , ती म्हणजे , वेगवान घोडदळ आणि तोफखाना हे एकाच वेळी
वापरता येऊ शकत नाही . वेगवान हालचाली करता तोफखाना हा अडचणीचा ठरत असे . आणि तोफान्याचा
वापर करायचा असेल तर एका जागी उभे राहून लढाया कराव्या लागतात . मग घोडदळावर अवलंबून राहता येत नाही !
त्यामुळेच पायदळापेक्षा इंग्रजांकडे घोडदळ उशिरा आले आणि ते ही पायदळाच्या मानाने
कमी संख्येने होते .
इंग्रजांना (कंपनीला) हे
सर्व जमले , कारण त्यांना – भारतात परंपरा अशी नव्हतीच . त्यांची
भारतातील “ पाटी “सर्व बाबतीत कोरी होती ! त्याच सुमारास युरोप मध्ये ही युद्ध
पद्धती स्थिरावली होती . त्यामुळे इंग्रजांना ( ईस्ट इंडीया कंपनीला ) वर दिलेल्या
समस्यांचा सामना करावा लागला नाही . सुरवातीला त्यांची शस्त्रे ( चांगल्या प्रतीच्या तोफा , बंदूका , दारूगोळा ) , तंत्रज्ञ ,
अधिकारी हे युरोप मधून येत असत . इंग्लंडच्या राजवटीची सुद्धा कंपनीला मदत होत असे
. शिवाय व्यापार आणि विशेषता: बंगालची “ दिवाणी “ मिळाल्या मुळे , पैशाचा प्रश्न सुटायला बरीच मदत झाली .
ह्या “ जमेच्या “ बाजूंमुळे
युरोपची युद्ध पद्धती भारतात आमलात आणणे त्यांना सोपे गेले ! त्याच बरोबर , मुंबई , मद्रास आणि कलकत्ता ह्या प्रेसिडेंसीस , जरी
सुरवातीला स्वतंत्र पणे कार्य करत होत्या , तरी नंतर
कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलच्या हाताखाली , ह्या तीनही
ठाण्यात सुसूत्रता आणली गेली ज्याचा फायदा , त्यांना दुसर्या
आणि तिसर्या मराठा – इंग्रज युद्धात ( १८०२ – १८०५ आणि १८१७/१८ ) फार मोठ्या प्रमाणावर झाला .
++++++++++++++++++
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा