Menu

 थोरल्या बाजीरावांची पालखेड मोहीम – १७२७-२८

बाजीरावांच्या पालखेड मोहिमेचे , मराठी राजवटीच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे , याचे कारण , छत्रपती शाहू महाराजांच्या स्थानाला आणि सत्तेला , हैदराबादच्या निजामाने , कोल्हापूरकर संभाजी II आणि चांदरसेन जाधव सारख्या सरदारांनी आव्हान दिले होते . त्यात त्यांचा पूर्ण पराभव होऊन , शाहू महाराजांची सत्ता कायम झाली . ह्या लढाईचा परिणाम जेव्हडा महत्वाचा होता , तेव्हडच महत्व , बाजीरावांच्या योजनेला ( strategy ) होत . म्हणूनच फील्ड मार्शल मोण्टेगोमोरी ( ज्यांनी दुसरया महायुद्धधात , जर्मनीला पराभूत करण्यात अतिशय महत्वाची भूमिका बजावली ) त्यांनी , आपल्या पुस्तकात – “  ए हिस्टरी ऑफ वोरफेयर ( १९६८ ) “ , बाजीरावांच्या पालखेडच्या लढाईचा समावेश केला आहे. त्यामुळेच ह्या मोहिमेबद्दल जास्ती जास्त माहिती असणे जरूरी आहे .

पालखेड मोहीम १७२७-२८

     शाहू महाराजांनी , १३ ऑक्टोबर १७२७ ला निजाम व इतरान विरुध्द्ध युध्ध पुकारले, आणि बाजीरावांची निजामा विरूद्धची पहिली मोहीम – पारनेर येथून सुरू झाली . ही मोहीम , निजाम पालखेड येथे बाजीरावाना शरण आल्यावर , १२ मार्च १७२८ ला,  जो मुंगी शेगावचा तह झाला , तेव्हा , ५ महिन्यांनी संपली .

या मोहिमे बद्दल काही गोष्टी लक्षात ठेवणे जारूरीचे आहे . बाजीराव २७ व मल्हारराव होळकर ३० वर्षांचे – तरुण आणि अननुभवी होते , तर निजाम ५६ वर्षांचा ,अतिशय मुरलेला राजकारणी आणि कसलेला लढवैय्या होता . त्याच्या कडे उत्कृष्ट मोगल तोफखाना आणि भरपूर सैन्य होते . त्याचे घोडदळ चांगले होते , परंतु त्यांच्या हलक्या चिलखता मुळे बाजीरावांच्या घोडदळा एव्हडे वेगाने प्रवास करू शकत नव्हते .  याउलट बाजीरावांकडे – फक्त ६००० घोडदळ होते . तोफखाना नव्हता . त्याचा फायदा वेगवान हालचालीन मध्ये झाला . परंतु तोफा नसल्याने ते समोरासमोर , एका जागी राहून , निजामाला तोंड देऊशकात नव्हते . त्यांना “ गनिमी कावा – हुलकावण्या देऊन , अडनेडया जागी निजामाला कोंडीत पकडणे “ हा एकच उपाय होता , आणि तोच त्यांनी परिणामकारक रीतीने वापरला .  दुसर, निजामाने जरी पुणे आणि आजूबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला , तरी बाजीरवांनी , बरहाणपुर – औरंगाबाद वर हल्ला करण्याची आवाई उठवली , आणि त्याच्या डावपेचात अडकले  नाहीत  . त्यांचा भर हा निजामाचा सधन प्रदेश लुटून फस्त करण्यावर होता , ज्यामुळे निजाम पुण्याचा ताबा सोडून देईल .आणि तसेच झाले .

फेब्रुवरी मध्ये निजामाला कळले की बाजीराव औरंगाबादवर चालून येतो आहे , तेव्हा , पुण्याचा मुक्काम हलवून तो तातडीने , अहमदनगर मार्गे औरंगाबादच्या वाटेला लागला . तोफखान्याचे “ लोढण “ नको म्हणून , त्याने तो , अहमदनगरला ठेवला , व तसाच औरंगाबादच्या रोखने निघाला आणि पालखेडला कैचीत सापडला !

खालील नकाशा मध्ये – गूगल मॅप वर दोघांच्या हालचाली दाखवल्या आहेत 

नकाशा क्र १ – थोरल्या बाजीरावांची पालखेड मोहीम – १७२७/२८


(  बाजीरावांच्या हालचाली – मिलिटरी हिस्टरी ऑफ इंडिया – जादूनाथ सरकार यांच्या पुस्तकाच्या – पान १४३/४४ वरून दाखवल्या आहेत . निजामाच्या हालचाली – मराठी रियासत – भाग – ५ ,बाजीराव १७२०-१७४०, पान ९८ – १०३ , वरून घेतल्या आहेत .)

१ ) काळी रेखा बाजीरावांच्या हालचाली आणि हिरवी जाड गडद रेखा , निजामाच्या हालचाली  दर्शवतात . फिकट हिरवी रेखा , निजामच्या सरदारच्या सूरतच्या मार्गाची आहे . 

२ ) भगवे ठिपके बाजीरावांच्या मुक्कामाची , तर हिरवे ठिपके निजामाच्या मुक्कामची ठिकाणे दाखवतात

३ ) काही ठिकाणे , नक्की जागा माहीत नसल्याने , नकाशात दाखवलेली नाहीत   

वरील नकाशावरून काही गोष्टी कळून येतात .

१ – बाजीराव व त्यांच्या सैन्याने या मोहिमेच्या ५ महिन्यात जवळ जवळ – ३०००- ३५०० कि मि प्रवास केला . प्रत्यक्ष प्रवासाचे अंदाजे ७५ दिवस धरले , तर सारासरीने त्यांनी दिवसाला ४० कि मि एव्हडी घोडदौड केली अस दिसत .

२ – याउलट ,  स्वता: निजामाने त्याच कलावधीत , जेमतेम १००० कि मिचा प्रवास केला . त्यात त्याच्या प्रत्यक्ष प्रवासाचे दिवस बहुदा ६०- ७० दिवसच असावे . म्हणजेच  सरासरीने  दिवसाला फक्त १२ - १५ कि मि  वेगाने प्रवास केला असणार ( तोफा , बाजारबुणगे , लवाजामा , चिलखती घोडदळ  इ मुळे ) 

३ - बाजीराव गुजरात मध्ये जरी जानेवारीचा जवळपास पूर्ण महिना होते , तरी त्या कालावधीत  , त्यांनी गुजरात मध्ये फक्त ३००- ३५० कि मि एव्हडाच प्रवास केला . थोडक्यात . ५ महिन्यां पैकी ४ महीने ते महाराष्ट्रातच ( मराठवाडा , खानदेश , पश्चिम विदर्भ )  निजामाला / त्याच्या सरदारांना हुलकावणी देऊन त्याचा प्रदेश लूटून उध्वस्त करीत होते . ( निझाम, १७२७ सुरवातीला मराठवाड्यात होता . तो डिसेंबर शेवट ते फेब्रुवरी १७२८ मध्या पर्यन्त पुणे व आसपासच्या परिसरात होता. )

४ – १५ डिसेंबर १७२७ ला बाजीराव बरहाणपूरला होते , तेव्हा ऐवजखान त्यांच्या मागे होता . निजाम ऐवज खानच्या मागोमाग होता . परंतु त्या नंतर निजामाच्या हालचाली बद्दल दोन मत प्रवाह आहेत . तो सूरतला , बाजीरावांच्या  मागावर गेला असे “ हदीकतुल आलम ”  ह्या ग्रंथात म्हटले आहे . परंतु बर्‍याच इतिहासकारांच्या मते निझाम स्वता: , बाजीराव बरहाणपूरहून निघून पश्चिमेला गेला आहे , असे पाहून , त्याचा नाद सोडून , पुण्याच्या रोखाने आला . माझ्या मते , सर्व बाबींचा विचार केल्यास , तो सरळ पुण्याच्या रोखानेच आला असणार हे खरे असावे . परंतु अशी शक्यता आहे , कि बाजीरावना गुजरात मध्येच अडवायला , त्याने एका मोठ्या सरदाराला  , सुरतला पाठवले असावे !   

५ – बाजीराव आणि निझाम दोघेही , आवाई उठवून भलती कडेच जात होते व एकमेकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत होते . दोघेही एकमेकांच्या बातम्या काढत होते व त्यानुसार पुढील मार्ग ठरवत होते . दोघांच्याही हालचाली एक विशिष्ट उद्देश डोळ्या समोर ठेऊनच होत होत्या – निजामाला शाहू महाराजांची सत्ता उखडायची होती व संभाजी – II ला राज्याभिषेक कारवायचा होता , तर बाजीरावांना निजामाचा पराभव करून शाहुंची सत्ता कायम राखायची होती .

६ – १५ फे. १७२८ नंतर च्या बाजीराव आणि निजाम यांच्या हालचाली – औरंगाबादच्या रोखानेच , परंतु विरुध्द्ध दिशेने झाल्या . बाजीराव उत्तरेतून – दक्षिणे कडे , तर निजाम, दक्षिणेकडून – उत्तरेकडे येत होता .

७ – बाजीरावांच्या वेगवान व गोंधळात टाकणार्‍या हालचालीन मुळे , निजामचे लक्ष पूर्ण पणे त्याच्या वर केन्द्रित झाले असणार . त्या मुळे , बजीरावांचे इतर सरदार – मल्हारराव होळकर , देवलजी सोमवंशी इ , यांच्या हालचालीन कडे दुर्लक्ष झाले असणार . परंतु बाजीराव गुपचूप , ह्या सर्वांशी संपर्क राखून होते व त्यांच्या         इशार्यानुसार इतर सरदार हालचाली करत होते , ज्याची कल्पना निजामाला आली नसणार . म्हणूनच तो पालखेडला – ह्या सर्वांच्या कोंडीत घेरला गेला .

लष्करी सामुग्री , सरदार , अनुभव इ बाबतीत निजामाची बाजू  , बाजीरावान पेक्षा वरचढ होती . परंतु बाजीरावांनी , त्यांच्या - उत्कृष्ट डावपेच , अनपेक्षित वेगवान हालचाली आणि सुसूत्र आममलबजावणीच्या जोरावर  निजामावर पूर्ण पणे मात केली आणि इतिहास घडवला !    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा