मराठी राजवट ( रियासत ) – वैशिष्ठ्ये आणि वैगुण्ये - भाग – २
-
तिसरे वैशिष्ठ्य - मराठ्यांचे औरंगजेबा विरुद्धधचे
स्वातंत्र्य युध्ध – हे एकमेवद्व्तिय असे उदाहरण असावे, ज्यात
आक्रमणा विरुद्ध राजा व प्रजा ह्या दोघांनी मिळून एव्हडा प्रदीर्घ लढा दिला आणि
शेवट पर्यन्त अजिंक्य राहिले ! या लढ्या मुळेच मराठी रियासतच्या भावी विस्ताराची
पायाभरणी झाली . आणि , भारतीय राजकारणात , मराठे हे एक शक्तिच्या स्वरुपात पुढे आले , ज्याचे
दूरगामी परिणाम पुढे घडणार होते !
हया लढ्यात काही गोष्टी
उठून दिसतात .
अ ) प्रदीर्घ कालखंड –
१६८१/२ ते १७०७ – औरंगजेबाच्या मृत्यू
पर्यन्त – २६ वर्षे हा लढा दिला गेला . म्हणजेच एक “ पिढी “ एव्हड्या काळा पर्यन्त
हा लढा चालू राहिला . हे शब्दशा: खर आहे , कारण ह्याच कालखंडात औरंगजेबाच्या
सैन्यात खरोखर एक पिढी जन्माला येऊन मोठी झाली ! इतक्या वेळ तो चालला .
ब ) तीन अलग अलग नेतृत्वा खाली हा लढा दिला गेला –
प्रथम संभाजी महाराजांनी १६८९ ला त्यांचा वध होई पर्यन्त दिला ( ८ वर्षे ) , नंतर
१६८९ ते व १७०० राजाराम महाराजांनी त्यांच्या मृत्यू पर्यन्त ( ११ वर्षे ) व नंतर
ताराराणीने लढा चालू ठेवला ( ७ वर्षे ) !
क ) लढ्याचा परिणाम
– मराठ्यान कडे - धड पैसा
नाही , की सैन्य नाही
, राजधानी नाही ( १६९० नंतर ) अशी परिस्थिति होती , ज्याच्या उलट औरंगजेबाकडे प्रचंड सैन्य ( ३ - ४ लाख ) , अगणित पैसा , मोठ मोठे सरदार , असे सर्व काही होत ! परंतू हा लढा
फक्त पैसा , सैन्य ह्यांच्या मध्येच नव्हता
, तो होता जिद्दीचा आणि स्वराज्याच्या इर्षेचा आणि
जनतेचा ! संभाजी महाराजांच्या क्रूरपणे केलेल्या वधामुळे संपूर्ण महाराष्ट्र
अक्षरशा: पेटून उठला ! डिवचलेल्या मधमाशान प्रमाणे ते औरंगजेबाच्या सैन्यावर , जिकडे जमेल तसे व तिथे , तुटून पडले !
१६९० मध्ये औरंगजेबाची, एक सोडून
, इतर स्वप्ने पूर्ण झाली होती . गोवळकोनड्याची कुतबशाही व
विजापूरची आदिलशाही ( दोन्ही शिया राजवटी होत्या ) त्याने जिंकल्या होत्या ( १६८६/७ ) . १६८९ ला संभाजी महाराज त्याच्या हाती लागून
त्यांना त्याने क्रूरपणे संपवले होते . १६९० मध्ये रायगड ( राजधानी ) हाती येऊन
संभाजी महाराजांची बायको – येसूबाई , मुलगा शाहू व इतर
परिवार हाती आला होता ! फक्त एक लहानशी चूक त्याच्या हातून घडली होती – राजाराम
महाराज रायगडा वरून निसटले होते ! इथपासूनच ही मोहीम त्याच्या हातून निसटत गेली !
राजाराम महाराजांनी जिंजीहून ( १६९० – १६९८ ) व नंतर १७९८ ला महाराष्ट्रात येऊन, आणि रामचंद्रपंत अमात्यांनी महाराष्ट्रात राहून जोमाने लढा चालू ठेवला !
निराश औरंगजेब – राजाराम महाराजांच्या
१७०० मधील मृत्यू नंतर सुद्धा ताराराणीने लढा चालू ठेवला होता . एकीकडे मराठी
सरदार हजारोंचे सैन्य घेऊन लढाया करत होते , तर दुसरीकडे मोगल सरदार लढाईला उभे
रहायला टाळत होते . रोगराई , नैसर्गिक आपत्ति ( ब्रम्हपुरी
ठाण्याला महापुराचा फटका बसला ) इ मुळे सैन्य , जनावरे यांचे
प्रचंड नुकसान होत होते . मराठे बलवान होत होते आणि मोगल कमजोर पडत चालले होते .
ह्या सर्व घटना बघून , हळू हळू औरंगजेब निराश होत गेला .
त्याचा खजिना रिता झाला . इतर सरदारांना
परत उत्तरेत जायची ओढ लागली . दक्खनने औरंगजेबाची जिद्द ,
पैसा , सामुग्री, मोगलांचा दरारा , हिंदुस्तानचा एकछत्री अम्मल, असे सर्व काही गिळून
टाकले ! अशी परिस्थिति असूनही, केवळ आपल्या हट्टीपणामुळे त्याने
ही मोहीम चालू ठेवली होती – कारण मराठ्यांचा पराभव व महाराष्ट्र जिंकणे हे
त्याच्या दृष्टीने “ धर्म युद्ध “ होते !. शेवटी अत्यंत निराश अवस्थेत औरंगजेब
१७०७ मध्ये अहमदनगरला मरण पावला. ( नर्मदा ओलांडल्या वर , तो
उत्तरेत परत कधीच जाऊ शकला नाही ) शेवट
पर्यन्त मराठ्यांना पराभूत करणे व महाराष्ट्र जिंकणे ,
त्याला जमले नाही . उलट त्याच्या मृत्यू नंतर कमजोर पडलेली मोगली सत्ता , उतरणीला लागली आणि तिची विघटनाकडे वाटचाल सुरू झाली ! आणि त्याच बरोबर, मराठी रियासत फिनिक्स पक्षा प्रमाणे भरारी घ्यायला लागली.
चौथे वैशिष्ठ्य – सिंहासन व कार्यकारी व्यक्ति
यातील विभाजन
आणखी एक ,
वैशिष्ठ्य म्हणजे , मराठी राजवट एका वेगळ्या स्थित्यंतरातून
गेली . इतर सर्व राजवटी मध्ये सिंहासन हे उदयापासून अंता पर्यन्त , वंश परंपरागत चालत गेले. ऊ . अकबर ,जहांगीर , शहजहान , औरंगजेब इ. परंतु मराठी राजवटीन मध्ये –
सिंहासनावर वंशपरंपरगत बसणे ( राजप्रमुख पद
) हे फक्त पहिली ३९ वर्षे चालल. ( १६७४ शिवाजी महाराज ते १७१३ , जेव्हा शाहू महाराजांनी पहिला पेशवा नेमण्यापर्यंत - शिवाजी महाराज , संभाजी , राजाराम , तारारणी व शाहू ) .शाहू महाराजांनी
बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पद दिले . असे अधिकार बाळाजींना दिल्या वर एक
महत्वाचे स्थित्यंतर मराठी राजवटीत झाले . सिंहासन व राज्य कारभार हे विभक्त
होण्याची सुरवात झाली ! छत्रपती , जरी शाहू महाराज राहिले व
राज्य कारभार जरी त्यांच्याच नावाने होत गेला , तरी
प्रत्यक्ष राज्य करणारी व्यक्ति ही पेशवेच झाली होती . कामाची वाटणी अशीच केली
गेली होती. प्रत्यक्ष कारभार पेशवेच बघत . त्यामुळेच पुढे १७१३ ते १८१८ हा
पेशवाईचा काळ समजला जातो . अर्थात पेशवे सुद्धा छत्रपतींचे एकनिष्ठ सेवक होते व त्यांच्या हुकूमानुसार व नावाने
राज्यकारभार चालत असे .( आजकालच्या राष्ट्रपतीं प्रमाणे ) असे प्रत्यक्ष राज्य कारभार करणारे घराणे, मधेच ( १७१३ ला ) बदलले गेले तरी
ते सरळ समजून उमजून , विचारपूर्वक झाले . त्यात इतर राजवटीन
प्रमाणे रक्तपात , लढाया किंवा पदच्युत करून हे झाले
नाही . हा बदल मराठी राजवटीच्या फायद्याचा
झाला , कारण मराठी राजवटीचा भारतभर विस्तार हा पेशवाईत झाला . असे इतर एत्त्देशीय राजवटीन
मध्ये झालेले आढळून येत नाही . आणि हेच मराठी राजवटीचे चौथे आणि महत्वाचे
वैशिष्ठ्य !
सर्वात पहिल्यांदा , शिवाजी महाराजांनी अष्ट प्रधान मंडळामध्ये , पेशवे
पद , निर्माण केले . त्यामुळे पेशाईचे जनकत्व हे शिवाजी
महाराजान कडे जाते – शाहू महाराजान कडे नाही ! परंतु त्यांच्या वेळेस - सिंहासन व
राज्य कारभारी व्यक्ति ही एकच होती – शिवाजी महाराज . ते मराठी राजवटीचे – संस्थापक
, छत्रपती व कारभारी होते . पूर्ण पणे स्वतंत्र होते .
त्यांचेच निर्णय व हुकूम इतर सर्वजण अमलात आणीत होते . ते स्वता: युद्धावर सुध्धा
जात . किंवा स्वता: चा जीव धोक्यात घालून मोहिमा यशस्वी करून दाखवीत . ( उ शाहीस्ते
खाना वरील लालमहालाचा -१६६३ चा छापा ) .
शाहू महाराजांच्या वेळेपासून ( १७१३ ) महत्वाचा फरक झाला – छत्रपती ( सिंहासन ) व
प्रमुख राज्य कारभार करणार्या व्यक्ति ह्या – दोन वेगळ्या झाल्या . हा फारच
दूरगामी परिणाम करणारा फरक होता . अर्थात हा बदल चांगला की वाईट , योग्य की अयोग्य होता – हा मुद्दा इथे विचारात घेतलेला नाही . असे झाले , त्या मागे त्यावेळची विशिष्ट पार्श्वभूमी – शाहू महाराजांची मोगलान कडील
१६८९ ते १७०७ पर्यन्तची कैद ( ऐन उमेदीतील - १८ वर्षे ,
ज्यामुळे न मिळालेला प्रत्यक्ष कारभार व युध्धाचा अनुभव ) , त्यांचा जन्मजात स्वभाव
वगैरे होती हे विसरता कामा नये
इतर कोणत्याही एतत्देशीय राजवटीत असा राज्य कारभार करणार्या
घराण्यात बदल होऊन ती राजवट पुढे विस्तारत गेली असे झाले नाही . किंबहुना असा बदल
झालाच नाही . उदयापासून ते अंता पर्यन्त तीच घराणी राज्य कारभार करीत होती ऊ , मोगल , आदिलशाही , कुतुबशाही . ( अहमद्नगरच्या निजामशाही मध्ये असा
प्रयत्न – मलिक अंबर ( १६०७ ते १६२७ ) व
नंतर शहाजी राजेंनी ( १६३३ ते १६३६ ) करून
पाहिला , परंतु तो अल्पजीवी ठरला . असाच प्रकार इंग्रजांच्या
बाबतीत झाला , १६१२ पासून ते १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्या
पर्यन्त ईस्ट इंडिया कंपनीची राजवट होती , पण नंतर इंग्लंडच्या राणीची सत्ता आली , जी १९४७
पर्यन्त टिकली .परंतु भारतातील त्यांच्या सत्तेचा विस्तार १८५७ पर्यन्त पूर्ण झाला
होता )
पाचवे वैशिष्ठ्य
मराठी राजवटीचे एक खास वैशिष्ठ्य , जे डॉ. गो. वी. दिघे – यांनी त्यांच्या – “
मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा – भाग – १ “ या पुस्तकात नमूद केल आहे ( पान ७० ) .
त्यांनी म्हटले आहे की “महमूदाने घोरीने , पंजाब , राजपूतना , कठेवाड , कनोज
पर्यन्त स्वार्या करून , अपरंपार संपत्ति नेली . महमुदाच्या
मागून आलेले पठाण तर स्थानिक होऊन
राज्यकर्ते बनले . या पठाणानाही शह देणारे मोगल बादशहा होऊन गेले . पण या सर्वांचे
आगमन वायव्ये कडून झालेले . दक्षिणेतून उत्तर जिंकण्याचा मराठ्यांचा प्रयत्न , एका दृष्टीने अपूर्वच समजला पाहिजे . “
याच पुस्तकाच्या प्रस्तावनेत ( पुरस्कार ) रियासतकार
सरदेसाई म्हणतात “ पूर्वी सत्याश्रय पुलुकेशी वगैरे दक्षिण्यांनी उत्तरेत
घुसण्याचा प्रयत्न केला , पण
दक्षिण्यांनी उत्तरेवर दीर्घकालीन कब्जा केला असा हिंदुस्तानच्या पाच हजार
वर्षांच्या इतिहासात फक्त मराठ्यांनीच ! दुसर्या कोणासही हा अद्वितीय गौरव
प्राप्त झाला नाही “
हा मुद्दा खरोखर लक्षात घेण्या सारखा आहे . आत्तापर्यंत , डॉक्टर दिघें शिवाय कोणीही हा मुद्दा उठवला
नव्हता . थोरल्या बाजीरावांनी ( १७२०-१७४० ) – नर्मदे च्या
उत्तरेत जाऊन – माळव्यात व गुजरात मध्ये मराठी राजवटीचा पाया मजबूत करायला सुरवात
केली, त्यामुळेच हे शक्य झाले . शाहू महाराजांची राजवट , जरी दक्षिणेतील मोगलांच्या ६ सुभयातून ( खानदेश ,
वर्हाड , बिदर , औरंगाबाद , विजापूर व हैदराबाद ) चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदां पासून
सुरूझाली , तरी त्यात गुजरात व माळवा चे हक्क नव्हते .
दाभाडे व बाजीराव यांनी गुजरात मध्ये आणि
बाजीराव यांनी माळवा आणि बुंडेलखंडात पाय रोऊन , मराठी
राजवटीची हद्द पार यमुने पर्यन्त नेली . पुढेतर मराठ्यांनी मोगल बादशहा कडून
मोगलांच्या २२ सुभ्याच्या ( पूर्ण हिंदुस्तनातून ) चौथाई व सरदेशमुखीची मागणी केली
. त्याच प्रमाणे महादजि शिंदे व पेशवे
ह्यांनी तर दिल्लीचे राजकारण पुण्याहून काही वर्षे केल ( १७७० – ८० ) . तो
पर्यन्तच्या इतिहासात , असे प्रथमच घडत होते ! हेच मराठी
राजवटीचे पाचवे वैशिष्ठ्य . (
खालील आकृती - ३ वरुन कल्पना येऊ शकते )
ह्याचा अर्थ ह्या मराठी राजवटीत दोष किंवा कमकुवत पणा नव्हता असे होत नाही .
प्रत्येक राजवटीची जशी काही बलस्थाने असतात तशाच कमकुवत जागाही असतात . मराठी
राजवटीमध्ये ही गुण / दोष किवा बलस्थाने व कमकुवत जागा दोन्ही होत्या . जशी
वैशिष्ठ्ये होती तशीच वैगुण्येही होती
पहिले वैगुण्य – तीन वेळेस झालेली अंतर्गत दुही मराठी राजवटीत , अंतर्गत दुहीची पाळी तीन वेळेस आली . पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या
मृत्यू ( १६८० ) नंतर – संभाजी – राजाराम यांच्या मधील सत्ता ग्रहण करण्या संबधित
. दुसर्यांदा – शाहू महरांच्या सुटकेच्या ( १७०७ ) नंतर ,
शाहू महाराज व ताराराणी यांच्यातल्या मान्यते ( खर्या छत्रपतींची गादी कोणास
मिळावी ) च्या वेळेस . तिसर्यांदा – नानासाहेबांच्या मृत्यू ( १७६१ ) पासून
राघोबादादा व इतर अशी दुही उघड झाली . शेवटल्या दुही मुळे मराठी राजवटीत
इंग्रजांचा जम बसत गेला व मराठी राजवटीच्या उतरणीस सुरवात झाली .
तिन्ही दुहिच्या घटनांना , राज्यकर्त्या व्यक्तीचा मृत्यू कारणीभूत होता . शिवाजी
महाराजांच्या मृत्यू नंतर ( १६८० ) – संभाजी की राजरामने गादीवर बसावे ह्या बाबतीत
राजकारण झाले पण लढाया झाल्या नाहीत . जे सत्तांतर झाले ते थोडक्यात झाले.
- ३ एप्रिल १६८० ला
शिवाजी महाराजांचा मृत्यू
- ६ मे १६८० सर्वांच्या विचाराने राजाराम मंचकारूढ
- २० जुलै १६८० संभाजी राजे मंचकारोहण करतात (१८ जून १६८० ला
राजाराम महाराजांना अटक )
शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याच्या जवळपास साडेतीन
महिन्यातच , निर्णायकपणे संभाजी
राजेंनी राज्य कारभार हातात घेतला . एकमात्र झाले की राजकीय अस्थिरता अल्प काळातच
समाप्त झाल्यामुळे आणि ( किंवा ) त्यामुळे आपापसात लढाई चे प्रसंग न आल्यामुळे
असेल , राज्यावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही . जे
झाले ते सुदैवाने लवकर आटोपले .
दुसर्या दुहिला कारणीभूत झाली ती घटना – औरंगजेबाचा मृत्यू
( २० फेब्रुवारी १७०७ ). त्याच्या मृत्यू नंतर
लगेचच त्याचा पुत्र अजमशहाने ( ८ मे १७०७ ) शाहू महाराजांना कैदेतून सुटका
करून , नर्मदेवरूनच महाराष्ट्रात परत पाठवले .
त्याचा परिणाम , मोगलांना हवा होता तसाच झाला . राज्य
मंचकावर कोणी बसायचे ह्या बाबतीत शाहू व ताराराणीच्या पक्षात झगडा सुरु झाला .
अगदी सुरवातीस ताराराणीचा पक्ष वरचढ ठरला तरी नंतर शाहू महाराजांकडे बरेच महत्वाचे
सदार वळले किंवा वळविण्यात शाहू महाराज यांचा पक्ष यशस्वी झाला ( उ . कान्होजी आंग्रे यांना बाळाजी विश्वनाथ
यांनी आपले कौशल्य पणाला लाऊन वळवले ) ही
दुसरी दुही सुद्धा मराठी राजवटीला सुदैवाने फारशी घातक ठरली नाही . जरी शेवट
पर्यन्त मराठी राजवटी मध्ये दोन छत्रपतींच्या गाद्या ( सातारा व कोल्हापूर ) तयार
झाल्या , तरी १७१९ / १७२० नंतर शाहू महाराजांची ( सातारची )
गादी ही अधिकृत म्हणून गणली गेली व प्रबळ होती . ( जरी ह्या दुहीचे दुष्परिणाम
झाले , तरी ते एका मर्यादेतच होते )
परंतु तिसरी दुही नानासाहेबांच्या मृत्यू ( १७६१ ) नंतरची .
राघोबा दादा ( नाना साहेबांचा भाऊ – थोरल्या बाजीरावांचा दूसरा मुलगा ) व इतर – प्रथम थोरले माधवराव पेशवे , नारायण राव आणि नंतरचा बारभाई कालखंड. ही दुही मात्र फारच घातक ठरली . इंग्रजांचा
मराठी राजवटीतला शिरकाव, हा नानासाहेब पेशव्यांनी, आंग्रे राजवटीचा पराभव करण्या करता , त्यांची मदत
घेतली ( इ १७५५ ) तेव्हापासूनच झाला .
परंतू , इंग्रजांचा
मराठी रियासति मध्ये जम बसत गेला तो राघोबा दादा पासूनच . ( इंग्रजाशी त्यांनी ६ मार्च १७७५ ला केलेला सुरतेचा
तह इथपासून . अर्थात हेही खरे आहे की , त्या काळी एतात्देशीय राज्यकर्त्यांच्या घराण्य्यातील , भांडणात बाहेरच्या शक्तीची मदत घेणे – १७४० नंतर विशेषता: इंग्रजांची , हे प्रचलित होते . त्यामुळे राघोबाददानी घरच्या भांडणात इंग्रजांची मदत
घेणे ह्यात विशेष असे काही नाही )
दुसरे वैगुण्य -
भव्य बांधकामे आणि कलेस उत्तेजन वगैरे या विषयी - हयाही बाबतीत मराठी
राजवट फारच मागे पडली . कदाचित पैशाची चणचण , बाह्य व अंतर्गत स्वस्थतेचा अभाव ह्यामुळे असेल, पण
भव्य , अद्वितीय किंवा वैशिष्ठ्यपूर्ण अशी बांधकामे , कलाकारी
झालेली आढळून येत नाहीत . ( रायगड , प्रतापगड , सिंधुदुर्ग , असे शिवाजी महाराजांनी नवीन बांधलेले
किंवा जिंजी सारखे जुन्या किल्ल्यात इष्ट
बदल केलेले किल्ले ,
किंवा शनिवार वाडा, असे फक्त मोजके अपवाद सापडतील . ) सूरत सारखी श्रीमंत शहरे सुद्धा उदयास आली नाहीत . ( नाही म्हणायला पुणे
शहर हे नानासाहेब पेशव्यांनी व सातारा शहर हे शाहू महाराजांनी मन:पूर्वक वाढविले )
उत्कृष्ठ , विद्वत्तापूर्ण अशी ग्रंथ रचनाही झालेली आढळून येत नाही .
या उलट मोगल ( फत्तेपूर सिकरी ,लाल किल्ला , ताजमहाल
इ ) , विजापूरची आदिलशाही ( गोल घुमट ) ,
गोवळ्कोंड्याची कुतुब शाही , यांच्या कारकिर्दीत झालेली
अद्वितीय किंवा भव्य बांधकामे आजही भारताची शान आहेत !
अशी वैगुण्ये असूनही , मराठी रियासतीचे – भारताच्या इतिहासातील स्थान हे अढळ आहे , वैशिष्ठ्य पूर्ण आहे !
+++++++++++++++++++++++++++
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा