मराठी राजवट ( रियासत ) – वैशिष्ठ्ये आणि वैगुण्ये - भाग – १
मराठी राजवट आणि दक्खनच्या इतर समकालीन राजवटींचे आयुष्य व
आकार यांची तुलना
मराठी राजवटीची सुरवात व शेवट कधीपासून धरायची ? मराठी राज्य हे १६५६ पासून सुरू झाले असे समजायचे का ? शिवाजी महाराजांनी , त्याची पायाभरणी , चंद्रराव मोर्यांपासून जावळी काबिज केली तेव्हा पासून झाली असे आपण म्हणू शकतो . की १६५९/६० पासून ? कारण १६५९/६० मध्ये अफजलखानाला मारल्या वर महाराजांनी बराचसा दक्षिण कोकण मधील प्रदेश काबिज केला व त्यांच्या राज्यास थोडा आकार दिला . की १६७४ च्या राज्याभिषेकपासून ?
असाच प्रश्न इंग्रजांच्या भारतातील राजवटी विषयी सुद्धा उपस्थित होतो .
इंग्रजांचे राज्य भारतात कधीपासून स्थापन झाले असे समजायचे ? १७५७ च्या प्लासीच्या लढाई पासून ? की , ३ जून १८१८ ला , जेंव्हा
दूसरा बाजीराव , आशिरगडाजवळ , ढोलकोट
येथे जनरल मालकम याच्या स्वाधीन झाला व
राज्यावर उदक सोडले , तेव्हा तेव्हापासून ? की १६ मे १८४९ , ज्या दिवशी मराठेशाहीची जी मूळची – सातरची गादी – ती खालसा झाली
तेव्हापासून पासून ? हाच प्रश्न मोगल राजवटी विषयी सुद्धा
उपस्थित होऊ शकतो . मोगल राज्य भारतात कधी स्थापन झाले ?
बाबर याच्या आगमनापासून ( १५२६ ) की हुमायून
पासून ( १५३० ) की अकबर १५५६ ला गादी वर बसल्या पासून ?
असेच प्रश्न कोणत्याही राजवटीच्या शेवटा बद्दल उपस्थित होतात . मोगल राजवटीचा
शेवट कधी झाला असे मनायचे ? १७०७
मध्ये औरगजेबाच्या मृत्यू झाल्यावर की मोगल बादशाह १७७३ मध्ये महादजि शिंदे व पर्यायाने मराठी राज्याचा
अंकित झाला तेव्हा ?
की १८५७ च्या स्वातंत्र युद्धामध्ये शेवटचा मोगल बादशाह इंग्रजांना शरण
गेला तेव्हा ?
राजवटींचे आयुष्य --- मराठी राज्याची
सुरवात जर १६७४ मधील शिवाजी महाराजांच्या
राज्याभिषेकापासून धरली व शेवट १८१८ साली झाला असे धरले तर मराठी राज्याचे आयुष्य
१४४ वर्षे भरते !
मोगल राज्याची सुरवात १५५६ अकबरापासून धरून , शेवट जर १७७३ धरला तर , मोगलांच्या राज्याचे आयुष्य २१७ वर्षे भरते . ( जर १८५७ मध्ये शेवट झाला असे मानले तर मोगल राज्य ३०१ वर्षे टिकले असे होते . )
भारतावरच्या इंग्रजांच्या राजवटीची खरी खुरी सुरवात १८१८ मध्ये पेशवाई संपवून झाली असे धरले तर , १८१८ ते १९४७ – सुमारे १२९ वर्षे त्यांचे भारतावर राज्य होते . ( ईस्ट इंडिया कंपनी सरकार ( १८५७/५८ पर्यन्त ) व त्या नंतरचे इंग्लंडच्या राणीचे ( १९४७ पर्यन्त ) , असा भेद केलेला नाही .( इतिहासकार इंग्रज राजवटीची सुरुवात १७५७ – प्लासीच्या लढाई, पासून झाली असे मानतात म्हणून १९४७ पर्यन्त १९० वर्षांचे आयुष्य होते . )
तीन मोठ्या राजवटींचे आयुष्य
v विजयनगर ----------------------------१३३६ – १५६५ ---------- २२९ वर्षे
v मोगल राजवट ---------------------- १५५६ – १७७३ ------------ २१७ वर्षे
v मराठी राजवट ----------------------- १६७४ – १८१८ ------------ १४४ वर्षे
( जावळी विजया पासून धरली तर ------१६५६ – १८१८ ----------- १६२ वर्षे )
दक्खन मधील काही मध्ययुगीन राजवटींचे आयुष्य -
n बहमानी –------------------------------१३४७ – १४८९ ---------- १४२ वर्षे
n आदिलशाही – ( विजापूर ) --------- १४८९ – १६८६ ----------- १९७ वर्षे
n कुतुबशाही - ( गोवळकोनडा ) –----- १५१८ – १६८७ ----------- १६९ वर्षे
n निजामशाही ( अहमदनगर ) –------ १४८९ – १६३३ ----------- १४४ वर्षे
n बरीदशाही ( बिदर ) ----------------- १४८९ – १६१९ ----------- १३० वर्षे
n इमादशाही ( वर्हाड ) -------------- १४८४ – १५७२ ------------ ८८ वर्षे
वरील माहिती वरून खालील
गोष्टी स्पष्ट होतात
१ ) २०० वर्षांपेक्षा
जास्त टिकलेल्या अशा फक्त २ राजवटी होत्या – पहिली मोगल व दुसरी , विजय नगर . विजापूरची आदिलशाही १९७ वर्षे होती ( जवळ जवळ
२०० वर्षे )
२ ) सर्वात कमी आयुष्य
वर्हाड च्या इमादशाही चे होते – ८८ वर्षे.
३ ) १७ व्या शतकात
स्थापन झालेली , मराठी राजवट ही एकच
होती. बाकी सर्व राजवटी १४ / १५ / १६ व्या किंवा १८ व्या शतकात स्थापन झाल्या
होत्या ! शिवाय , १९ व्या शतका पर्यन्त टिकून राहिलेली , अशी फक्त मराठी राजवट होती .
भारतातील त्या काळच्या
राजवटीनच्या आयुष्याचा विचार केल्यास त्या साधारण पणे -१५० – १७० वर्षांच्या आसपास अस्तीत्वात होत्या . याचा
अर्थ , मराठी राजवट ही सर्वसाधारण इतर राजवटींच्या
काळा एवढी अस्तीत्वात होती .
ही झाली फक्त आकडेवारी .
परंतू ,राजवटी मागील कारण परंपरेचा अर्थ लावायचा झाल्यास प्रत्येक राजवटीची
स्थापना , तीचा कालखंड व शेवट कसा आणि कोणत्या परिस्थित झाला
हे पहिल्या नंतरच मराठी राजवटीची वैशिष्ठ्ये लक्षात येतात आणि ती खास होती असे
अभिमानाने म्हणावे लागते !
मोगल राजवटीची सुरवात
जरी अकबर गादीवर बसल्या पासून धरली , तरी दोन गोष्टी स्पष्ट आहेत . एक म्हणजे , उत्तर
हिंदुस्थानात परकीय ( मुसलमानी ) राजवट ही
बाबर ( मोगल ) याच्या आधीपासून अस्तीत्वात होती .खिल्जी घराण्याची राजवट – १२९० – १३२० अस्तीत्वात होती ज्याची राजधानी
दिल्ली होती .त्या नंतर तुघलक घराण्याची सत्ता ( १३२० – १३४७ ) दिल्लीवर
प्रस्थापित झाली. त्यांनी तर जवळपास पूर्ण भारतावर सत्ता स्थापन केली , परंतु ती अल्पजीवी ठरली . बहमानी राजवट , तुघलक राज्यातूनच फुटून निघून दक्खन मध्ये स्थापन झाली . पुढे बहमानी राज्याचे विघटन होऊन दक्खन मध्ये
५ राजवटिनचा उदय झाला – कुतबशीही ( गोवळकोंडा ) , आदिलशाही (
विजापूर ) , निजामशाही ( अहमदनगर ) ,
इमादशाही ( वर्हाड ) आणि बरीदशाही ( बिदर
) .
पैकी शेवटच्या तीनही राजवटिंचा घास घेतला जाऊन - कुतुबशाही व आदिलशाही शिल्लक राहिल्या . परंतु शेवटी १६८६ / ८७ मध्ये , त्यासुद्धा औरंगजेबाने गिळंकृत केल्या
वरील विवेचना वरून असे
दिसते की प्रमुख तीन कारणांनी राजवटी उदयास आल्या
१ ) सत्तांतर - मोगली राजवट ही शून्यातून निर्माण झाली नाही . बाबराने
आणि नंतर हुमयूनने, प्रस्थापित
राजवटींचा पराभव करून सत्ता स्थापन केली व मोगल राजवट दिल्ली वर सुरू झाली .
म्हणजेच रणांगणावरील ( पानीपतचे दुसरे युद्ध ) परभवा मुळे सत्तांतर झाले व मोगल राजवट
आली . पुढे वंशपरंपरेने मोगल राजवट चालू
राहिली
२ ) विघटन – बहामनि राजवट ही त्यवेळच्या तुघलक राजवटीन पासून फुटून निघून ऊदयास आली . पुढे तिचेच विघटन होऊन
, प्रथम ५ राजवटी उदयास आल्या ज्या पैकी फक्त
२ राजवटी ( कुतबशाही आणि आदिलशाही )
१६८६/७ ला औरंजेबाने गिळंकृत करे पर्यन्त अस्तीत्वात होत्या . त्यानंतर त्या पैकी
एकही राजवट अस्तीत्वात नव्हती !
खालील नकाशे बहमानी
राजवटीतून फूटून निघालेल्या ५ राजवटी व शेवटी गोवळकोंड्याची कुतुबशाही व विजापूरची
आदलीशाही यांचे कालानुसार अस्तित्व दाखवतात . त्यात विजय नगर साम्राज्याचा अस्त ही
दिसतो
३ ) जवळ जवळ शून्यतून – मराठी राजवट ,जी शिवाजी महाराजांनी स्थापन केली , ती मात्र सत्तांतर वा विघटन या कारणामुळे उदयास आली नाही . तिची सुरवात , जवळ जवळ शून्यातूनच झाली . शिवाजी महाराजांकडे शहाजी राजेंची जागिर – पुणे , सुपे , इंदापुर परिसरात होती त्या पासून ती झाली . परंतु शेवटी शहाजि राजेंची जागीर ही आदिलशाही राजवटीतील इतर अनेक जागिरीन पैकी एक होती . स्वतंत्र नव्हती . म्हणजेच पारतंत्र्यातूनच स्वराज्य उभे करायला लागले . ते सुद्धा तीन प्रबळ शत्रूंशी – मोगल , आदिलशाही व सिद्दी ( जंजिरा ) यांच्या बरोबर अनेक लढाया लढून ( एकंदर २२३ पैकी ८० टक्के ह्या तिघां बरोबर ) करावी लागली . अंतर्गत शत्रू हे परत वेगळेच .
इंग्रजान्ची भारतातील
राजवट ही सुद्धा शून्यातून निर्माण केली गेली . इंग्रज सुरवातीला फक्त
व्यापारकरिता आले . भारतात ईस्ट
इंडिया कंपनीचा शिरकाव १६१२ मध्ये
सूरतला फॅक्टरी स्थापन करून झाला . परंतु त्यांना भारत भूमीवर त्यांच्या राजवटीची
पायाभरणी करायला पुढे जवळ जवळ १७५७ पर्यन्त म्हणजे १४५ वर्षे लागली . ( जर १८१८
साली सुरवात धरली तर २०६ वर्षे राजवट स्थापन कारयला लागली )
परंतू शिवाजी महाराजांनी
फक्त १८ वर्षात ( १६५६ च्या जावळी विजया पासून -१६७४ च्या राज्याभिषेका पर्यन्त )
आपली मराठी राजवट, वयाच्या
४४ व्या वर्षा पर्यन्त , स्थापन करून दाखवली .
त्यामुळेच मराठी राजवट
ही इतर त्या वेळच्या राजवटीन मध्ये वेगळी व उठून दिसते , कारण ती स्वदेशी आणि
शून्यातून निर्माण केली गेली होती . तिचा उदय हा विशिष्ट स्थितीत , शून्यातून व पारतंत्र्यातून झाला - हेच तिचे पहिले वैशिष्ठ्य
राजवटींचा – उदयास्त व स्थित्यंतरे
सर्व राजवटी ह्या उदया नंतर , विस्तार व घसरण ( आणि शेवटी अस्त ) अशा दोन प्रमुख कालखंडातून जातात . त्याला
विजापूर आणि कुतबशाही , मोगल राजवटी ह्या सुद्धा अपवाद नव्हत्या . खाली आकृतीत ( १ ) दर्शविल्या प्रमाणे ,
सर्वसाधारण राजवटी , इंग्रजी A
आकारानुसार - विस्तार व घसरण – आशा दोन स्थित्यंतरतून जातात .
[ सुटसुटीतपणा साठी , स्थैर्याचा काळ किंवा आकारात होणारे लहान सहान बदल , कोणत्याच राजवटीच्या बाबतीत धरलेले
नाहीत .]
मराठी राजवटीची पार्श्वभूमी – महाजांनी जी स्वराज्याची ज्योत लावली तीचे रूपांतर पुढे
त्यांच्या वंशजांनी व इतरांनी मशालीत केले जिचा प्रकाश जवळजवळ पूर्ण भारतभर पसरला
! राजवटीची सुरवात १६५६ मधील जावळी विजया नंतर मानली तरी , १६७४ च्या राज्याभिषेका पर्यन्त त्यांची
राजवट फक्त महाराष्ट्रा पुरतीच सीमित होती . दक्षिणेतील प्रदेशाची – कर्नाटकातील
काही प्रदेश , तंजावर , जिंजि इ त्यात
भर पडली , ती १६७६ च्या दक्षिण दिग्विजयानंतर .तरीही
महाराजांच्या राजवटीचा आकार इतर समकालीन मोगल , आदिलशाही आणि
कुतब्शाहींच्या मनाने तसा लहानच होता . १७८० मध्ये ,
महाराजांच्या मृत्यू समयी - महाराष्ट्रातील भाग हा साल्हेर पासून ते कारवार
पर्यन्तचा पट्टा ( जवळ जवळ ६५० की मी लांब
व साधारण १०० की मी रुंद असा -
६५००० चौरस कीमीचा प्रदेश ) आणि दक्षिणेतील तंजावर , जिंजि इ
प्रदेश ( तो अंदाजे १०,००० किमी असावा ) असा मिळून ७० – ८०,००० चौरस किमी चा प्रदेश असे राज्य होते . १६८० पर्यन्त मोगल राजवट –
अफगाणिस्तान पासून ते बंगाल पर्यन्त (
पूर्व पश्चिम ) आणि काश्मीर पासून विजापूर आणि गोवळकोनद्या पर्यन्त ( दाक्षिण –
उत्तर ) अशी पसरलेली होती . तिचा अंदाजे क्षेत्रफळ २५ लाख चौरस किमी असावे !
आदिलशाही राजवटीचे क्षेत्रफळ होते – अंदाजे ४-५ लाख चौरस किमी . गोवळ्कोंद्यच्या
कुतबशाहीचे आकारमान अंदाजे २.५ ते ३.० लाख चौरस किमीचे असावे !
परंतु १७०७ मध्ये – औरंगजेबाच्या मृत्यू समयी – मराठी राजवट वगळता इतर दोन्ही
राजवटी शिल्लक नव्हत्या ! ( १६८६/८७ मध्ये
औरंगजेबाने – आदिलशाही आणि कुतबशाही – ह्या दोन्ही राजवटी गिळंकृत केल्या होत्या !
) हीच मराठी राजवट पुढील शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर फक्त ८० वर्षात ( १७६१
च्या पानीपत च्या युद्धा पर्यन्त ) जवळ
जवळ भारत भर पसरलेली होती - राजस्थान पासून बंगाल पर्यन्त व दिल्ली पासून खाली
कार्नाटका पर्यन्त . १७६० मधील मराठी
राजवटीचे क्षेत्रफळ अंदाजे – १२ - १५ लाख चौरस किमी असावे
मराठी राजवट -१६८० मराठी राजवट – १७६० ( पिवळ्या रंगातील )
शिवाजी महाराजांच्या १६८० मधील अकाली मृत्यू नंतर जरी औरंगजेब महाराष्ट्रात
१६८१/२ मध्ये सर्व शक्तिनिशी उतरला होता , तरी मराठी राजवट – महाराजांनी पेटवलेल्या
स्वराज्याच्या ज्योतिमुळे मोगलांचा
प्रतिकार करून नुसतीच जीवंत राहिली नाही तर , पुढील फक्त
८० वर्षात ती जवळ जवळ भारत भर पसरली ! (
वरील नकाशे पहा ) .
अर्थात हे स्थित्यंतर सरळ झाले नाही . १६८१/२ च्या औरंगजेबाच्या आक्रमणा , पासून ते १७०७ मधील मृत्यू पर्यन्त मराठी
राजवट आक्रसली जाऊन जवळपास फक्त कोकण
किनार पट्टी व जिंजी इत्यादि भागापूर्ती
मर्यादित झाली . पुढे शाहू महाराजांची १७०७/८ मध्ये झालेली सुटका ही मराठी
राजवटीला मिळालेली कलाटणी होती . महत्वाचे म्हणजे , शाहू
महाराजांची मोगलांनी केलेली सुटका ही
मराठी राजवटीला फक्त नवसंजीवनी म्हणूनच सिद्ध झाली नाही तर ती थोड्याच काळात
अत्यंत वेगाने विस्तार होण्यास कारणीभूत झाली .त्याच बरोबर शिवाजी महाराजांच्या
वेळे पासून एक अंगभूत अशी शक्ति आणि वृत्ती जी लोकांना आणि राजवटिला प्राप्त झाली , त्या शक्ति आणि वृत्ती मुळेच पुढील विस्तराच्या कालखंडात मराठी राजवटी वर
झालेल्या १७६१ च्या पानीपत पराभवाचा जीवघेण आघात सुद्धा तिने पचवला .१८०० नंतर
पुढे घसरण सुरू होऊन ,
१८१८ मध्ये – दूसरा बाजीराव इंग्रजांना शरण गेला आणि राज्यावर उदक सोडले
आणि तिची अधिकृतपणे समाप्ती झाली !
म्हणजेच मराठी राजवट ही चार
स्थित्यंतरतून ( कालखंडातून ) गेली
.
पहिला कालखंड ( स्थित्यंतर ) - १६५६ ( महाराजांचा जावळीचा विजय ) ते १६८० (महाराजांच्या
मृत्यू पर्यन्त) हा पायाभरणी व विस्तारचा (२४ वर्षांचा) .
दूसरा कालखंड ( स्थित्यंतर ) – १६८० पासून -
औरंगजेबाच्या मृत्यू व शाहू महाराजांची सुटका- (१७०७) व शेवटी १७२० मधील बाजीरावांची
पेशवाईची सुरवाती पर्यन्तचा कालखंड (४० वर्षांचा) . तो राजवटीच्या जीवनमरणाचा , अस्थिरतेचा व आक्रसण्याचा कालखंड होता .
तिसरा कालखंड ( स्थित्यंतर ) – थोरल्या बाजीरावाना – त्यांचे वडील - बाळाजी विश्वनाथ
यांच्या मृत्यू नंतर १७२० मध्ये पेशवाईची वस्त्रे मिळाल्यावर , मराठी राजवट वेगाने परत उसळी घेऊन माळवा , गुजरात पर्यन्त विस्तारत गेली . तिचा विस्तार पुढे , नानासाहेब , थोरले माधवराव पेशवे ( १७७३ ) असे पर्यन्त होत गेला . त्यानंतर ती १८००
पर्यन्त जवळपास त्याच स्थितीत होती ( ८० वर्षांचा ) .
चौथा कालखंड ( स्थित्यंतर ) - नंतर मात्र तिची वेगाने घसरण होत गेली व शेवटी १८१८
मध्ये दुसर्या बाजीरावाने इंग्रजांपुढे शरणागती पत्करली , तेव्हा अस्त झाला ( १८ वर्षात ) !
[ वरील कालखंड हे ढोबळ मनाने धरलेले आहेत . त्यावर मतांतरे असुशकतात . परंतु
मूळ मुद्दा हा स्थित्यंतराचा आहे ]
थोडक्यात मराठी राजवटच इंग्रजी M अक्षराप्रमाणे ४ स्थित्यंतरातून गेली . ( उदय ) विस्तार , आक्रसणे , दूसरा विस्तार , घसरण ( अस्त ) ! आणि हेच तिचे आगळेपण आणि वैशिषठ्य , जे इतर समकालीन कोणत्याही राजवटीन मध्ये आढळून येत नाही .
|
|
|
पहिला कालखंड – १६५६ ते
१६८० – विस्तार ( २४ वर्षे )
दूसरा कालखंड – १६८० ते
१७२० – आक्रसणे ( ४० वर्षे
)
तिसरा कालखंड – १७२० ते
१८०० – दूसरा विस्तार ( ८० वर्षे )
चौथा कालखंड – १८०० ते
१८१८ – घसरण ( १८ वर्षे
)
[ राजवटीचे आयुष्य
काढताना , अधिकृत सुरवात १६७४ – शिवराज्याभिषेक पासून धरली आहे .परंतु आकृती
मध्ये , मराठी राजवटीची सुरवात १६५६ मधील जावळी वरील विजया
नंतर झाली असे मानले आहे ]
- भाग १ समाप्त
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा