Menu

मुखपृष्ठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुखपृष्ठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

II श्री II 

भारतीय मध्य-युगीन इतिहासात, मराठी राजवटीचे अनन्य साधारण असे स्थान आहे , ज्याच्या शिवाय तो पुरा होउच  शकत नाही . मराठी मनाला अभिमान वाटेल अशीच कामगिरी पूर्वजांनी केली . अजूनही मराठी राजवटीचा इतिहास , देश विदेशच्या अभ्यासकांना , इतिहासकारांना  खुणावत असतो . अशा हौशी अभ्यासकांपैकी मी एक . गेली काही वर्षे मराठी राजवटीचा अभ्यास करतांना , काही प्रश्न पडले , त्याची उत्तरे शोधायचा प्रयत्न केला . त्या प्रयत्नात , मोगल , ईस्ट इंडिया कंपनी , हैदर , टिपू , फ्रेंच इत्यादींचा सुद्धा अभ्यास करणे अपरिहार्य झाल . ही उत्तरे , विषय याविषयी जरा वेगळ्या दृष्टीकोनातून विचार केल्यावर , मग ते इतर जिज्ञासून पुढे ठेवण्याची  इछा झाली , आणि म्हणून हा प्रपंच !  

             " मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा ...... " संत रामदास
ह्या एका वाक्यात सर्व आले ! ह्या वाक्यास अनुसरून शिर्षक , लेख , भाषा इ बाबी नक्की केल्या . 

मराठा शासनकाळ हे शीर्षक ठेवण्याचे प्रमुख कारण – १७ / १८ आणि १९ व्या शतकातील मराठी राजवट ही गेली कित्येक वर्षे – मराठा – ह्या नावाशी निगडीत आहे . तेच नाव प्रचलित झाले आहे . परंतु सर्व लेखान मध्ये ,” मराठी राजवट “ हाच शब्द प्रयोग – मराठा शासन काळ हे वर्णन करण्या करता वापरला आहे . 

“ मराठी राजवट हे शिर्षक जास्त समर्पक वाटले , जे रियासतकारांच्या ( गोविंद सखाराम सरदेसाई ) मराठी रियासत या त्यांच्या  शेकडो पानी ग्रंथसंभाराला दिलेल्या नावावरून घेतले ! कालखंड १६३० - शिवाजी महाराजांच्या जन्मा पासून ते दुसर्‍या बाजीरावाने १८१८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी समोर शरणागति  पत्करली व राज्यावर उदक सोडले, तो पर्यन्त ठेवला आहे . ह्या संकेत स्थळावर शिवाजी महाराज , संभाजी महाराज , राजाराम महाराज ताराराणी   आणि शाहू महाराज व पेशवाई अस्ताला जाई पर्यन्तच्या  घडामोडींचे व कार्याचे लिखाण समाविष्ट असेल  .  वरील उल्लेख केलेल्या प्रत्येक व्यक्तिबाबत मराठीत लिखाण झालेले आहे . बरीच संकेत स्थळेही आहेत , जी उत्तम माहिती देतात . परंतु वरील सर्व व्यक्तींच्या कार्याचा उद्देश हा शेवटी, उभ्या हिंदुस्थानात  बलिष्ठ मराठी राजवट  ( मराठा शासन ) उभी करणे हाच होता , हे आपण विसरू शकत नाही . आणि कोणत्याही राजवटीचा विचार हा तिच्या विविध अंगांबाबत एकत्रित करावा लागतो उ. राज्यकर्ती व्यक्ति , आर्थिक , राजकीय , लशकरी धोराणे , सामाजिक स्थिति , प्रतिस्पर्धी राजवटी  इ . म्हणूनच ह्या संकेत स्थळावर या सार्वांच्या बाबतीत लेख किंवा उल्लेख आढळेल . 

१७७० नंतर मराठी राजवटीचा संबंध ज्या राजवटीशी  जास्त आला ईस्ट इंडिया कंपनी - त्या विषयी  मराठीत फार कमी लिखाण झाले आहे . ही एक उणीव भरून काढायचा विचार आहे . तसा हा विषयही  महत्वाचा आहे , कारण दुसर्‍या बाजीरावाचा पराभव करूनच कंपनीने उभ्या भारतावर जवळपास पूर्ण कब्जा केला . मराठी राजवट हीच काय तो त्यात सर्वात मोठा अडथळा होता !   त्यामुळे मराठी राजवटी बरोबर, कंपनी ( प्रतिस्पर्धी  )  विषयी सुद्धा आपण खोलात जाऊन , माहिती करून / जाणून घेतले पाहिजे  .  ( एका अर्थाने , भारताच्या पारतंत्र्याची सुरवात , ही १८१८ पासूनच सुरू झाली ! )     

वरील कारणांमुळे ह्या ब्लॉग मधील विषय हे थोडे  वेगळे  आहेत . या महत्वाच्या विषयांच्या / राजवटीच्या अंगांबाबत , जिज्ञासूंना, थोडीफार  वेगळी माहिती द्यावी  असा प्रयत्न आहे . ह्यामुळे , काही जणांना कदाचित, नवीन विचार सुचतील , त्यांच्या मनात काही  प्रश्न उद्भवतील - काहींची  उत्तरे मिळतील  आणि  विचारांना चालना मिळू शकेल  .   

सर्व लिखाण हे ऐतिहासिक पुस्तके , शोध निबंध इ च्या आधारेच केलेले आहे . प्रमुख आधार हा नावाजलेले इतिहासकार -  रियासतकार सरदेसाई ( यांच्या मराठी , इंग्रज व मोगल रियासत ह्या ग्रंथ / पुस्तके ) , जदूनाथ सरकार , आर सी मुजूमदार , न चि केळकर , शेजवलकर , बाबा साहेब पुरंदरे ह्यांचे व इतरांचे  विषयानुरूप असलेले लिखाण हाच आहे . ईस्ट इंडिया कंपनीच्या बाबतीत मात्र काही परदेशी लेखकांच्या पुस्तकांचा, लेखांचा आधार घेतला आहे .  

पुढे मागे , google map च्या आधारे बर्‍याच घटना , ठिकाणे इ दाखवण्याचा विचार आहे. लिखाणाची भाषा , सध्यातरी फक्त मराठीच ठेवली आहे . काही काळा नंतर , इंग्रजी आवृत्ती द्यायचा विचार आहे .  ह्यातील  मते , व्यक्त केले विचार हे माझे स्वता:चे आहेत . ते कुणास पटतील किंवा त्या बाबत  मतभेदही  असतील ,ती गोष्ट अलाहिदा .

वाचकांचे अभिप्राय विचारात घेऊन योग्य त्या चुका नक्कीच सुधरल्या जातील . बाकी सर्व वाचकांवर सोपवतो !