स्वराज्या करता शिवाजी महाराजांनी लढलेल्या लढाया-
१६४४ – १६८०
१६४४ मध्ये रोहिडा किल्ला
जिंकण्याकरता शिवाजी महाराजांनी ( वय - १४ वर्षे ) पहिली लढाई केली . त्यानंतर
त्यांच्या मृत्यू पर्यन्त ( १६८० , वय – ५० वर्ष
) त्यांनी स्वराज्य स्थापन करून वाढवण्या करता एकंदरीत महत्वाच्या २२३ लढाया
केल्या . ( जी यादी उपलब्ध आहे त्यावरूनच हा लेख बेतलेला आहे . ह्या शिवाय , अनेक लढयांचा यात समावेश झालेला नाही .माझ्या अंदाजाने ३०० च्या आसपास लढाया
झाल्या असाव्यात . )
२२३ पैकी
बहुतांश लढाया जिंकल्या , परंतू काही अपवादात्मक लढायात त्यांना माघार / हार मानावी लागली किंवा
मोहीम अयशस्वी झाली – उ सिद्दी . हयापैकी-
६२ लढायात महाराजांनी स्वता: नेतृत्व केले / त्यात प्रत्यक्ष लढले . इतर लढाया
ह्या त्यांच्या सरदारांनी स्वतंत्र केल्या , की ज्यात ते
सामील नव्हते .
१ ) प्रमुख शत्रू व लढाया - स्वराज्याचे प्रमुख शत्रू – मोगल आणि आदिलशाही
यांच्या बरोबर सर्वात जास्त लढाया झाल्या . जंजीर्याचा सिद्दी आणि व्यंकोजी राजे
यांच्या बरोबरही त्यांना लढव लागलं . या कालखंडात त्यांना - मोगल ( ८६ लढाया ) , आदिलशाही ( ८९ लढाया ) , इतर - स्वकीय व सिद्दी , इंग्रज , पोर्तुगीज इ ( ४८ लढाया ) विरुद्ध लढावे लागले .
शिवाजी महाराजांचे स्वराज्य , आदिलशाहीचे लचके तोडूनच –
दक्षिणेत जास्त पसरले असल्यामुळे त्यांच्या , सर्वात जास्त
लढाया ह्या आदिलशाही विरुद्ध झाल्या यात
आश्चर्य नाही . परंतु , मोगलांचा नाशिक
जवळील फक्त “ बागलण “ भागच स्वराज्यात सामील होता. म्हणूनच आदिलशाही एव्हड्याच लढाया , मोगलां विरुध्द्ध
( ८६ ) का कराव्या लागल्या हा प्रश्न उभा होतो . ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे , मोगलांची आक्रमणे – शाहीस्ता खान ( १६६३ ) व मिर्झा राजे ( १६६५ ) यांनी
घेतलेले किल्ले व प्रदेश . नंतर तेच किल्ले / प्रदेश , परत
मिळविण्या करता परत लढाया कराव्या लागल्या - . उ - मोगलांना दिलेले २३ किल्ले , चाकण इ परत घेण्या करता .
स्वकीयात सर्वात जास्त लढाया ( १२ ) महाराजांचा सावत्र भाऊ – व्यंकोजी ह्या
विरुध्द्ध – दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या संदर्भात झाल्या . तसेच सिद्दी विरुध्द्ध
१३ लढाया केल्या , परंतु ,
त्यांना सिद्दिला पूर्ण पराभूत करून जंजिरा जिंकणे शक्य झाले नाही .
२ ) कालखंड व लाढाया –
कालखंड व लढाया , यांचा विचार केला तर त्या मध्ये , स्वराज्याला
/ शिवाजी महाराजांना तोंड द्याव्या लागलेल्या सर्व महत्वाच्या
घटनांचे- संकट आणि संधि - प्रतिबिंब यात पडलेले
दिसते. उ –१६४४ ते १६५५ पर्यंतच्या ११ वर्षात फक्त ६ लढाया केल्या .
याचे महत्वाचे कारण म्हणजे , शहाजी राजेंना , २५ जुलै १६४८ मध्ये – आदिल शहाच्या , मुस्ताफा खान , बाजी घोरपडे ( जे शहाजी राजेंचे भाऊ बंद होते ) इ सरदारांनी – दगाबाजीने
कैद केले . जरी त्यांना १६ मे १६४९ मध्ये सोडले , तरी शहाजी
राजे बराच काळ आदिलशाहीतच होते . त्यामुळेच १६५० पर्यन्त शिवाजी महाराजांनी काही
हालचाल केली नाही .( सरसरीने दोन वर्षात एक लढाई )
परंतू
१६५६ च्या जावळी विजया पासूनच्या ४ वर्षात – १६५९ पर्यन्त
- जावळी धरून १७ लढाया करून राज्य विस्ताराची दमदार सुरवात
केली . ( ४ वर्षात – दर तीन महिन्यात एक लढाई )
नंतरच्या – १६५९ ते ६९
ह्या दहा वर्षात ६४ लढाया केल्या / कराव्या लागल्या . ( सरसरीने दर
दोन महिन्यात एक लढाई ) ह्याचे पहिले कारण
– १६५९ ला अफजलखानाला प्रतापगड भेटीत
मारल्या वर , त्यांनी परत उचल खाल्ली व एकेक प्रदेश
काबीज करून स्वराज्यात दाखल करून घेतला . दुसरे कारण – मिर्झा राजेंची – स्वराज्या
विरुद्धची – १६६४-६५ ची मोहीम . त्याच्या आक्रमणाला तोंड देण्याकरता २६ लढाया
झाल्या . ( ह्याच काल खंडात , अफझलखान वध , सिद्दी जोहारचा पन्हाळ्याचा वेढा
, महाराजांची सुरतेवरील पहिली मोहीम ,
शाहीस्ते खाना वरील लाल महालाचा छापा, शहाजी राजेंचा मृत्यू , महाराजांची एकमेव सागरी मोहीम - बसरूर , पुरंदरचा
तह , ऐतीहासीक आग्रा
भेट – कैद व पलायन अशा बर्याच महत्वाच्या
घटना घडल्या . )
यानंतर १६७० – १६८०
मधील त्यांच्या मृत्यू पर्यन्तच्या कालखंडात ( ११ वर्षात ) – १३६ लढाया
केल्या . ( सरासरीने दर महिन्याला एक लढाई ! ) . या पैकी -
मोगल ५६, आदिलशाही ४८ आणि इतर ३२ ( ज्यात प्रामुख्याने व्यंकोजी राजेन विरूध्द्ध
) अशा लढाया झाल्या . या कालखंडात दक्षिण दिग्विजयची
मोहीम झाल्यामुळे , २९ वेळेस शिवरायांनी नेतृत्व केले . दक्षिण दिग्विजया नंतर परत आल्यावर ( जून १६७८ ) त्यांच्या मृत्यू
पर्यंतच्या जवळपास २ वर्षात, त्यांनी फक्त एकदाच ( जालना स्वारी ) नेतृत्व
केले . याचे प्रमुख कारण – संभाजी राजेंचे मोगलांकडे जाणे ( डिसेंबर १६७८ ) हेच
असावे . संभाजी राजे जरी डिसेंबर १७८९ मध्ये
आले ,तरी महाराज त्याच चिंतेत असणार . शिवाय दक्षिण
दिग्विजयाच्या निमित्ताने , जवळ जवळ दोन वर्षे ते स्वराज्या बाहेर होते ,त्यामुळेच बहुदा प्रशासकीय व इतर कामे करण्यात वेळ गेला असावा .
३ ) लढाया व राज्य विस्तार
– स्वराज्याचा विस्तार , जवळपास शून्यातून झाला . तो सुध्धा
– मोगल आणि आदिशाही आशा बलाढ्य शत्रूंचे प्रदेश / किल्ले काबिज करूनच करावा
लागल्याने , प्रत्येक किल्ल्या करता ,
प्रदेशा करता लढाई करणे अपरिहार्य होते .प्रश्न होता
महाराजांनी कोठून , कधी व कोणल्या दिशेने विस्तार करायचा –
उत्तर ( मोगल ) की दक्षिण ( आदिलशाही ) दिशेने .
त्यांनी विचारपूर्वक दक्षिण दिशा निवडली , कारण ,
मोगलांच्या मानाने आदिलशाही कमकुवत होती . राज्य विस्ताराचा पाया , त्यांनी जवळच्या – जावळी विजया पासून ( १६५६ ) करून , मग , कोकण किनार्या वरील प्रथम - कल्याण / भिवंडी व आजूबाजूचा प्रदेश जिंकला . मग १६५९ ला अफजलखानाला मारल्या वर , दक्षिण कोकण , वाई व त्या जवळील प्रदेश जिंकला . तळ
कोकण त्या नंतर जिंकला . महाराष्ट्रातील स्वराज्याच्या ७० % प्रदेशाची उभारणी , ही राज्याभिषेकाच्या आधीच – १६७३ पर्यन्त पूर्ण झाली होती . मोगलांचा बागलण
, रामनगरचे कोळी राज्य , दक्षिण
दिग्विजय इ मोहिमा , त्यांनी १६७४ च्या राज्याभिषेका नंतरच
हाती घेतल्या .
प्रथम , जवळचा
प्रदेश काबिज केला . मग
त्याच्या नजीकचा प्रदेश , असा टप्प्या टप्प्याने , संधि साधून लगेच , विस्तार केला ( नकाशा क्र – २ )
. ह्याचे प्रतिबिंब – लढायांची वर्षे व त्या ठिकाणांची ( पुण्या पासूनची सरळ
रेषेतील ) त्यांची अंतरे, यात स्पष्ट दिसते . १६४४ ते १६५६
पर्यन्तच्या लढाया – ५०- १०० की मी अंतरा पर्यन्त
झाल्या . नंतर तो परीघ – १६६३ पर्यन्त जवळ पास २५० – ३०० की मी वाढला . १६७३ पर्यन्त तो जवळ जवळ ५०० की मी पर्यन्त
विस्तारला . दक्षिण दिग्विजय मोहिमे दरम्यान – १६७८ पर्यन्त तो ( दक्षिणेत ) - १००० की मी ( जिंजी ) पर्यन्त गेला .
( ह्याच
कालखंडात- सुरते वरील दुसरी मोहीम , साल्हेर , मुल्हेरच्या प्रसिध्द्ध लढाया , राज्याभिषेक , दक्षिण दिग्विजय मोहीम , इ घटना घडल्या )
वरील विवेचन आणि खालील ३ नकाशे यावरून , लक्षात येणार्या काही गोष्टी -
अ ) नकाशा
क्र १ - राज्य विस्तार आणि क्र ३ - लढाया , यांचा सरळ संबध दिसतो . त्यातून एक महत्वाचा निष्कर्ष निघतो . ९० टक्के लढाया, प्रदेश
काबिज करण्या साठी झाल्या ! फक्त लूटी ( पैशा ) करता – ( सूरत , कारंजा इ ) स्वार्या फार कमी केल्या . ( पुढे पेशवाई मध्ये , प्रदेशा
करता कमी आणि पैशा करता जास्त राज्य
विस्तार झाला )
ब )
बहुसंख्य लढाया – किल्ले वा त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकण्या करता केल्या .
क )
पद्धतशीर पणे आणि दूर दृष्टी दाखवून , त्यांनी
प्रदेश काबिज केले . उ – सैन्य संख्या , पैसा आणि माणसे तयार
होत गेली त्यानंतरच दूरचे प्रदेश काबिज केले
. ( आधी सह्याद्रीच्या आसपासचा प्रदेश
काबिज केला . राज्याभिषेका नंतरच दक्षिण
दिग्विजय केला . त्याच प्रमाणे , मोगलांचा प्रदेश( बागलण) काबिज करण्याचा
प्रयत्न शेवटी केला . ) ( नकाशा क्र – २ )
नकाशा क्र – १ -- शिवाजी महाराजांचे राज्य -- १६८० -- https://en.wikipedia.org/wiki/Maratha_Empire)
नकाशा क्र २-- “ मराठ्यांच्या आरमाराचा इतिहास “-- संशोधक – सुरेश वसंत शिखरे - (इतिहास विभाग – शिवाजी विद्यापीठ -- २०१७ , परिशिष्ठ – ५ )
++++++++++++++++++++
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा