महाराष्ट्रातील किल्ले ( दुर्ग / गड ) व त्यांची गूगल नकाशावरील स्थाने
“ आज्ञा पत्र “ आणि किल्ले ( दुर्ग ) – रामचंद्र पंत “अमात्य” बावडेकर ( १६५०- १७१६
) , ह्यांनी “ आज्ञा पत्र “ ,हा राजनीति विषयक ग्रंथ-- शिवाजी
महाराजांचे विचार, आचार आणि उच्चार सांगण्या करिता लिहिला . त्यांनी शिवाजी
महाराजांच्या निधना नंतर , जवळ जवळ २५ वर्षानी ,कोल्हापूऱकर छत्रपती संभाजी – II , यांच्या सांगण्या वरून तो लिहिला
. ( रामचंद्र पंत अमात्य यांचा ५ छत्रपतींशी संबंध आला – शिवाजी महाराज , संभाजी महाराज , राजाराम ,
कोल्हापूरकर शिवाजी महाराज व संभाजी महाराज-II )
त्यात एकूण ९ प्रकारणे असून , ८ आणि ९ ही किल्ल्यां विषयी आहेत . शिवाजी महाराजांचा किल्यान विषयीचा दृष्टिकोन, एकाच वाक्यात अतिशय परिणामकारक रीतीने व्यक्त केला आहे . ते म्हणतात – “ संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग ... “ .
श्री . जोगळेकरांनी “ सह्याद्रि “ ( पान ११२ ) वर शिवाजी महाराज आणि किल्ले ह्या
बाबतीत म्हटले आहे की “
महाराष्ट्रातील किल्ले ह्या स्वराज्याच्या किल्ल्या आहेत हे त्याने जाणले “. अगदी अर्थपूर्ण आणि चपखल पणे महाराजांची
किलल्यान विषयीची आस्था , प्रेम आणि त्यांचे महत्व -
जोगळेकरांनी संगितले आहे ! ह्याचे प्रत्यंतर महाराजांनी किल्यान वर केलेला खर्चाचे
आकडे पाहिले की येते !
शिवाजी महाराजांनी
बांधलेले / पुनर्स्थापित केलेले किल्ले –
रायगड , प्रतापगड ( १६५६ ), राजगड ,) , विजय दुर्ग ( १६५३ ) ,खांदेरी
( १६७८ ) , अलिबाग ( १६७९ ) ,उंदेरी (
१६८० ) , राजकोट , सरजेकोट आणि
सिंधुदुर्ग ( १६६४ ) हे किल्ले मालवण बंदराच्या रक्षणा साठी उभारले . ( मालवण बंदर शिवाजी महाराजांनी
बांधले . ) कुलाबा ,
पद्मदुर्ग , सुवर्ण दुर्ग , बिरवडी
१६५८ , पालगड – मणडण गड – प्रचीतगड –
पद्मगड उर्फ कांसे ( १६६१ ) .
महाराष्ट्रा बाहेरचे बांधलेले किल्ले – वेल्लोरच्या भोवतालच्या प्रदेशाचे रक्षण करायला
– साजरा - गोजरा ही किल्ल्यांची जोडी ( १६७८ ) बांधली .
शिवाजी महाराज किल्ले बाधून किंवा काबिज करून , माणसे नेमून थांबले नाही . त्यांनी किल्ल्यांच्या दुरूस्ती /
देखभाली करता मोठ्या रकमा मंजूर केल्या . ( रायगडा साठी ५०,००० होन ,
सिंहगड - सिंधुदुर्ग - विजय दुर्ग इ
करता प्रत्येकी १०,००० होन , प्रचंड गड
– महिपतगड इ करता ५००० होन . सिंधुदुर्ग
बांधायला , एका अंदाजानुसार , शिवाजी
महाराजांनी १ कोटी होन खर्च केले ! १६७१
-७२ मध्ये महाराजांनी किलल्यान करता १,७५,०० होन , एव्हडा राखीव निधि उभा कराचे ठरवले . हा
निधि फक्त आणिबाणी किंवा अति महत्वाच्या वेळेसच वापरायचा होता . हा निधि किती व
कोणत्या महालातून उभा करायचा हे देखील आखून दिले होते . ) महाराजांनी किल्ल्यांवर –
नवीन बांधणे , जुने मजबूत करणे ,
डागडुजी / दुरूस्ती इ सर्व बाबीन वर अमाप पैसा खर्च केला !
महाराष्ट्रातील दुर्ग / गड कोटान विषयी माहिती -
खालील माहिती , ही
प्रामुख्याने एका ( Ph.D. करता तयार केलेल्या ) संशोधन प्रबंधा वरून घेतली
आहे “ महाराष्ट्रातील गड , कोट , दुर्ग प्रयोजन आणि व्यवस्थापन ( १६३० – १६८०
)
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ , संशोधक – श्रीकांत नारायण तापीकर – २०१२ “
महाराष्ट्रातील किल्ल्यांचे वर्गीकरण
जळदुर्ग किनारी
गिरीदुर्ग वनदुर्ग स्थळदुर्ग
गढी सराई एकूण
१) कोकण १० ३९ ६७ १८ - १ - १३५
२ ) प. महाराष्ट्र - - १२७ २० २६
११ १ १८५
३) विदर्भ - - ३ ११ २४ ९ १ ४८
४ ) मराठवाडा - - १० २ ९ - २ २३
_________________________________________________________________
वरील तक्त्या वरून काही गोष्टी समोर येतात .
१ ) महाराष्ट्रात – गिरी दुर्ग ( डोंगरावरील )
आणि वनदुर्ग ( जंगलातील ) हे जवळ जवळ ६६
% ( ३९१ पैकी – २५८ )
आहेत . त्यानंतर स्थळ दुर्ग आणि जळ /
किनारी दुर्ग येतात .
२ ) सह्याद्रीच्या रचनेमुळे प. महाराष्ट्रात व
कोकणात मिळून ८५ % किल्ले आहेत
जिल्हावार किल्ल्यांची संख्या खालील प्रमाणे -
जिल्हावार
किल्ले – ठाणे
– ३६ , मुंबई – ६ , रायगड – ४७ ,
रत्नागिरी – २४ , सिंधुदुर्ग – २२ ,
नंदुरबार – ८ , धुळे -५ , जळगाव – १० , नाशिक – ५७ , अहमदनगर – १७ ,
पुणे – ३० ,
सातारा – २८ , सांगली – १२ ,
कोल्हापूर – १३ , सोलापूर – ९ ,
बुलढाणा – ७ , अकोला – ४ , अमरावती – ३
, यवतमाळ – ४ , वर्धा – ७ , नागपूर – ७ , चंद्रपूर – ६ ,
भंडारा – ४ , गोंदिया – ३ , गडचिरोली –
३ , औरंगाबाद – ११ , जालना – १ , परभणी – २ , बीड – २ , लातूर , २ , नांदेड – २ , उस्मानाबाद –
२ .
( प्रकरण – २ , भाग ५ आणि ६ )
सह्याद्रि वरील दुर्गान
मध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त किल्ले आहेत ( ५७ ) , आणि सांगली , कोल्हापूरात कमी आहेत . असाच
प्रकार कोकण किनारपट्टी वरील
किल्ल्यांच्या बाबतीतही झाले आहे . रायगड जिल्ह्यात ( ४७ ) किल्ले आहेत आणि
सिंधुदुर्ग जिल्हहयात – २२ . याचे कारण खालील
नकाशात वरून कळून येते . सह्याद्रीची ऊंची , उत्तरेला नाशिक
जवळ जास्त आहे , आणि दक्षिणेकडे – सांगली, कोल्हापूर कडे ती कमी होत
जाते . त्यामुळे असे अनुमान काढता येऊ
शकते की , ऊंची मुळे असा ,
किल्ल्यांच्या संख्येत , दक्षिणोत्तर फरक पडला असावा .
दुसरे
कारण - महाराष्ट्रातील सर्वोच्च १०
शिखरां पैकी ५ शिखरं नाशिक जिल्ह्यात आहेत
( साल्हेर – १५६७ मि . ,सप्तशृंगी – १४१६ मि . ,
मुल्हेर – १३०६ मि , ब्रम्हगिरी – १३०४ , तौला – १२३१ मि ) , त्यानंतर अहमदनगर – २ ( कळसूबाई
– १६४६ मि . , हरिश्चंद्रगड – १४२४ मि ) . त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त
किल्ले असावेत .
मैदानी प्रदेशात – फारच कमी किल्ले आहेत आणि त्यात भुईकोट किल्ले जास्त असावेत .
महाराष्ट्र ,
किल्ल्यान बाबतीत सुदैवी ! इतर
राज्यांच्या मानाने , महाराष्ट्रात – सह्याद्रि मुळे – बहुदा
सर्वात जास्त किल्ले असावेत . अक्षांश , रेखांश नुसार महाराष्ट्रातील किल्ल्यांची स्थिति खालील कोष्टकात ( क्र १
) दिलेली आहे ( किल्ल्यांच्या संख्येच्या बाबतीत , बखरी बखरी
मध्ये आणि इतर माहिती यात तफावत असायचे महत्वाचे कारण म्हणजे – काही ठिकाणी गढया
वा फार छोटे भुईकोट किल्ले सुध्धा धरले असावेत किंवा नसावेत .)
कोष्टक – १ |
|||||
रेखांश ७२
७३ ७४ |
|
||||
अक्षांश |
किल्ल्यांची संख्या |
एकूण |
महत्वाचे ठिकाण |
||
२२ २१ २० १९ १८ १७ १६ १५ १४ |
|
|
|
|
|
१ |
३ |
१३ |
१७ |
|
|
९ |
१८ |
२७ |
५४ |
नाशिक
/ साल्हेर/मुल्हेर |
|
३० |
५३ |
३ |
८६ |
जुन्नर /शिवनेरी |
|
१३ |
५२ |
३ |
६८ |
पुणे /रायगड |
|
-- |
४० |
१६ |
५६ |
सातारा / प्रतापगड |
|
-- |
२६ |
१६ |
४२ |
विशाळगड |
|
-- |
९ |
१३ |
२२ |
|
|
-- |
-- |
६ |
६ |
|
|
|
|
|
|
|
|
५३ |
२०१ |
९७ |
३५१ |
|
किल्ल्यांच्या बाबतीत , मराठीत बरेच लिखाणही झाले आहे , संकेत स्थळे ही आहेत . गिरी भ्रमण हा युवकान मध्ये लोकप्रिय आहे व त्याबद्दल बरीच संकेत स्थळे पण आहेत . ह्या सर्व प्रयत्नांमुळे , महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वाची व उपयुक्त अशी माहिती उपलब्ध आहे . त्या मध्येच भर घालण्या करता हा छोटा उपक्रम – गूगल मॅप ( नकाशा ) वरील त्यांची ठिकाणे निश्चित करणे - हाती घेतला , ज्या मुळे एक महत्वाची उणीव भरून निघेल असे वाटते . जिज्ञासूंना व इतरांना हा उपक्रम उपयुक्त ठरेल अशी आशा करतो .
तपशील – बर्याच
ठिकाणची उपलब्ध माहिती एकत्र केल्या वर – महाराष्ट्रातील
३९८ किल्ल्यांची माहिती मिळाली . त्यात - जल
, गिरी दुर्ग , भुईकोट किल्ले ,
गढया इ
सर्व धरलेले आहेत . सुस्थितीत असलेले , नसलेले , नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले , असे सर्व किल्ले
आलेले आहेत . अजूनही काही किल्ल्यांच्या
बाबतीत खात्री करणे बाकी आहे . ते झाल्यावर तेही किल्ले नकाशात दाखवण्यात येतील .
माझ्या माहिती नुसार किल्ल्यांचा जिल्हा
दिलेला आहे . तसेच ज्यांचे नक्की
ठिकाण सापडले नाही , त्या किल्ल्यांची ठिकाणे
अंदाजानुसार दाखवलेली आहेत . ( असे किल्ले फारच
थोडे आहेत . बहुतेक सर्व किल्ले गूगल मॅप ( नकाशावर ) दाखवण्यात आलेले आहेत
)
बरेचसे किल्ले – विशेषता: गिरी दुर्ग , हे ५०० वर्षापेक्षा जुने असूनही , ते त्यातल्या
त्यात सूस्थितीत आहेत . काही किल्ले शिवाजी महाराजांनी नवीन बांधलेले किंवा जुन्या
किल्ल्यांची मजबूती केलेली आहे . थोडे त्या नंतर बांधले गेले आहेत . बरेच छोटे
किल्ले / भुईकोट / गढया , मानवी अतिक्रमणा मुळे किंवा
अनास्थे मुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत .
+++++++++++++++++++++++
महाराष्ट्रातील किल्ले व त्यांची स्थाने -
गूगल मॅप वर दाखवलेली महाराष्ट्रातील किल्ल्यांची स्थाने बघण्या करता , कृपया वरील लिंक वर " क्लिक " करा .
समाप्त --
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा